शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:44 IST

वाशिम: खायला न मिळाल्याने, तसेच माकडे पिटाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगरूळपीर शहरात  एक माकड पिसाळले असून, मंगलधाम परिसरात गत सहा दिवसांपासून या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवरक्षक शर्थीचे प्रयत्न करीत असून, सहाव्या दिवशी कारंजा येथून एक पिंजरा उपलब्ध करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांना घेतले चावे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खायला न मिळाल्याने, तसेच माकडे पिटाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगरूळपीर शहरात  एक माकड पिसाळले असून, मंगलधाम परिसरात गत सहा दिवसांपासून या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवरक्षक शर्थीचे प्रयत्न करीत असून, सहाव्या दिवशी कारंजा येथून एक पिंजरा उपलब्ध करण्यात आला आहे.मंगरूळपीर शहरात काही महिन्यांपासून माकडांचे मोठमोठे कळप ठिकठिकाणी संचार करीत आहेत. जंगलात चारा आणि पाणी नसल्याने ही माकडे दिवसभर लोकवस्तीत संचार करतात. अशात त्यांच्याकडून धान्याची नासधूस होत आहे. या माकडांना पिटाळण्यासाठी नागरिक विविध प्रयत्न करीत आहेत. अशातच खायला न मिळाल्याने आणि नागरिकांच्या सततच्या त्रासामुळे मंगलधाम परिसरात संचार करणारे एक माकड पिसाळले असून, या माकडाने दोन तीन व्यक्तींना ईजाही केली आहे. लहान मुलांची सुरक्षा या माकडामुळे धोक्यात आली असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभाग आणि मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्याकडे करण्यात आली; परंतु या माकडास पकडण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने वनविभाग आणि वन्यजीवरक्षकही हतबल झाले आहेत. दरम्यान, सहाव्या दिवशी मंगळवारी कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरे यांनी माकडास जेरबंद करण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून दिला आहे.  

टॅग्स :washimवाशिमforestजंगल