वाशिम : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत आहेत. त्यामुळे उघड्यावर शाैचास जाणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ०००००००००० प्लास्टिक बंदी नियमाचे उल्लंघन
वाशिम : शहरातील काही प्रमुख भागांत प्लास्टिक पिशवी बंदी नियमाचे उल्लंघन केले जात आहे. काही दुकानांमधून व भाजीपाला विक्रेत्यांकडून सर्रास ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात. ००००००००००
मास्क न वापरल्याबद्दल दंड!
वाशिम : मास्कचा वापर न केल्याबद्दल वाशिम येथे वाहतूक शाखेच्या चमूने मंगळवारी जवळपास १४ जणांवर दंडात्मक कारवाई केली. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, ट्रिपल सीट वाहन चालवू नये, नियमाचे पालन करावे; अन्यथा यापुढेही कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. ००००००००
ग्रामीण भागात धूरमुक्त अभियानाला खीळ
वाशिम : एलपीजी गॅस-सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस मिळालेल्या बहुतांश महिलांनी दरवाढीमुळे गॅसचा वापर बंद करीत पुन्हा चुली पेटविल्या आहेत. त्यामुळे धूरमुक्त अभियानाला खीळ बसत आहे.