शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
5
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
6
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
7
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
9
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
10
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
11
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
12
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
13
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
14
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
15
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
16
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
17
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
18
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
19
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
20
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

स्तनपानसंदर्भात महिलांना मार्गदर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:32 IST

महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी सोमवारी महिलांना मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वाशिम येथे ३ आॅगस्ट रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन स्तनपानसंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानसंदर्भात महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी सोमवारी महिलांना मार्गदर्शन केले. माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपानाला अनन्यसाधारण महत्व असून, मातांनी शक्यतोवर स्तनपान टाळू नये, असे आवाहन त्यांनी केले. अंगावर दूध पाजल्याने स्त्रियांना, मातांमध्ये स्तनाच्या गर्भाशयाच्या व अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो तसेच गरोदरपणात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते; यासोबतीला योग्य व्यायाम घेणे व आहारात स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणात घेणे आवश्यक असते. प्रसुतीनंतर होणारा अतिरिक्त, जास्तीचा रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. उतारवयातील हाडांच्या ढिसुळपणापासूनही संरक्षण होते. स्तनपान सुलभ असल्यामुळे त्यासाठी कोणत्याही पुर्वतयारीची आवश्यकता नसते, असे डॉ. लाहोरे यांनी सांगितले. यावेळी महिलांची उपस्थिती होती.

स्तनपानमुळे बाळांना मिळणारे फायदे

  • आईचे दूध पचायला सोप असते, आईच्या दुधाचे तापमान योग्य असते. 
  • आईचे दूध निजंर्तुक असते, कारण ते आईच्या स्तनातून सरळ बाळाला मिळते.
  • आईचे दूध जिवतं असल्याने त्यात रोगप्रतिकारक शक्ती असते. त्यामुळे न्यूमोनिया,जुलाब व इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते. 
  • आईच्या दुधावर वाढणाºया मुलांची बौध्दिक व मानसिक क्षमता
  • जास्त असते, दमा व अ‍ॅलर्जीपासून सरंक्षण मिळते. 
  • भावी आयुष्यात स्थूलता, रक्तदाब, हदयविकार, मधुमेह या
  • आजारांपासून सरंक्षण मिळते. 
  • आई व बाळाचे भावनिक, प्रेमाचे नाते अधिक मजबूत होते.
टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य