ब्रह्मा येथे बचत गटांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:39+5:302021-03-07T04:38:39+5:30

------------- पोहरादेवीतील बाधितांचा आकडा ४२ पोहरादेवी : परिसरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. दरदिवशी येथे कोरोना ...

Guidance to self-help groups at Brahma | ब्रह्मा येथे बचत गटांना मार्गदर्शन

ब्रह्मा येथे बचत गटांना मार्गदर्शन

Next

-------------

पोहरादेवीतील बाधितांचा आकडा ४२

पोहरादेवी : परिसरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. दरदिवशी येथे कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळून येत असून, आजवर ४२ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे.

------------------

महाबीजकडून बियाण्यांची तयारी

वाशिम : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजने तयारी केली असून, कृषी विभागाच्या मागणीनुसार, अनुदानित बियाणे उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्तावही पाठविल्याचे जिल्हा व्यवस्थापकांनी शुक्रवारी सांगितले.

----------------------

गणेशपूर बॅरेजमध्ये १० टक्के

वाशिम: शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने गणेशपूर येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजमध्ये आता १० टक्के साठा उरला आहे. त्यामुळे विहिरींच्या पातळीवरही परिणाम झाल्याने सिंचनात अडथळे येत आहेत.

--------------

वाशिममधील २० रोहित्रांची दुरुस्ती

वाशिम : तालुक्यात कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांत बिघाड झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी येत होत्या. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर महावितरणने आठवडाभरात २० रोहित्रांची दुरुस्ती केली आहे.

---------------

बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी

वाशिम : तालुक्यातील दगड उमरा येथे शुक्रवारी एका व्यक्तीस कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली.

Web Title: Guidance to self-help groups at Brahma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.