शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’वरुन मशरुम उत्पादनाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 4:08 PM

लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही मशरुम उत्पादकांनी ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’ तयार करून मशरूम उत्पादनातील विविध तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन सुरु केले आहे.

वाशिम : मागील चार पाच वर्षांत शेतकरी व बेरोजगार युवकांचा मशरूम उत्पादनाकडे कल वाढला आहे. तथापि पुरेशी माहिती नसल्याने त्यांना परिश्रम करूनही अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही मशरुम उत्पादकांनी ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’ तयार करून मशरूम उत्पादनातील विविध तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन सुरु केले आहे.सध्या आपल्या देशात मशरूम उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्षात जवळजवळ ७३ हजार टन मशरूम उत्पादन होते. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ म्हटले जाते. पावसाळ्यात येणारी ही वनस्पती आहे. बुरशी गटात ती मोडते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या या नावांनी ती ओळखली जाते. जगभरात मशरूमच्या १२ हजारांहून अधिक जाती आहेत. मशरूमची प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, इंडोनेशिया, कोरिया, चीन या देशांत लागवड केली जाते. सर्वात जास्त मशरूम जर्मनीमध्ये खाल्ले जाते. मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो. भारतात मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे व त्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. बटन मशरूम, शिंपला मशरूम, अशा मशरूमच्या काही जाती आहेत. वाशिम जिल्ह्यातही अनेक शेतकरी व बेरोजगार युवक मशरूम शेती करून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, मशरूम उत्पादन करताना घ्यावयाची काळजी, उत्पादनाची पद्धत, बाजारपेठ आदिंची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाशिममधील काही मशरूम उत्पादकांनी ‘व्हॉटसअ‍ॅप ग्रुप’ तयार करून त्याद्वारे मार्गदर्शन सुरू केले असून, या ग्रुपमध्ये वाशिम जिल्ह्याबाहेरच्याही तज्ज्ञ मशरूम उत्पादकांसह एकूण ६० लोकांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीWhatsAppव्हॉटसअ‍ॅप