शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भावना गवळींच्या संपत्तीत दीड पटीने वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 14:22 IST

पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार भावना गवळी यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांमध्ये दीड पटीने वाढ झाली आहे.

वाशिम : वाशिम व यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघाचे मिळून सलग चार वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खासदार भावना गवळी यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांमध्ये दीड पटीने वाढ झाली आहे. अर्थातच यात जमिनीच्या दरांमध्ये पाच वर्षांत झालेल्या दरवाढीचा मोठा वाटा आहे. सध्या त्यांच्या नावावर एकूण ९ कोटी ६८ लाख ७३ हजार १८९ रुपये मूल्य असलेली संपत्ती आहे. 

खासदार भावना गवळी यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे. यात त्यांनी स्वत:च्या नावावर एकूण १ कोटी ५७ लाख १५ हजार २७५ रुपये मूल्याची चल संपत्ती दर्शविली आहे. २०१४ मध्ये नामनिर्देशनपत्र भरताना त्यांनी दर्शविलेल्या संपत्तीनुसार स्वत:च्या नावावर एकूण ६ कोटी ०८ लाख ८६ हजार ०४० रुपये मूल्य असलेली चल आणि अचल संपत्ती होती. याचाच अर्थ पाच वर्षांत त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ३ कोटी ५९ लाख ८७ हजार १४९ रुपयांनी वाढ झाली आहे. यात सर्वात मोठा वाटा हा अचल संपत्तीचा आहे. अचल संपत्तीमध्ये शेती, बिगरशेती आणि व्यावसायिक जमीनींचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये जमिनीचे बाजारमूल्य आणि आताच्या बाजारमूल्याची तुलना केली असता खासदार भावना गवळी यांची संपत्ती वाढल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे एकूण २४ लाख ७० हजार ७८० रुपये रोकड आहे. खासदारांच्या नावे बँकेत ६४ लाख ३१ हजार ८८४  जमा असल्याचे दर्शविले आहे. बँक, बाँड आणि विम्यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक १० लाख २७ हजार ७०० रुपये आहेत. स्वत:कडे २00 ग्रॅम सोने तर १२०० ग्रॅम चांदी याची गुंतवणूक ७ लाख एक हजार ५२० आहे. 

सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे एकूण ११ लाख ३४ हजार ९६४ रुपये रोकड होती. खासदारांच्या नावे बँकेत ८५ लाख ८८ हजार ५३७  जमा होते. बँक, बाँड आणि विम्यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक ७ लाख ६६ हजार ९५८ रुपये होते. तसेच २00 ग्रॅम सोने तर १२०० ग्रॅम चांदी त्यांच्याजवळ त्यावेळी होती. 

७३ लाखाचे कर्जखासदार भावना गवळी यांच्या नावावर ७३ लाख १६ हजार २५० बँकाचे कर्ज आहे

५० लाख ८७ हजाराची वाहनेखासदार भावना गवळी यांचेकडे तीन वाहने असून यामध्ये  हुंडाई क्रेटा, टोयाटो इनोव्हा, हुंडाई वणार्चा समावेश आहे. याची अनुक्रमे किंमत १७ लाख ५० हजार, २४ लाख ३७ हजार, ९ लाख असे एकूण ५० लाख ८७ हजार रुपयांचे वाहने आहेत.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक