शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ग्रीन सिटी’साठी ‘ग्रीन वाशिम’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  गतवर्षी देवतलाव स्वच्छता मोहीमेनंतर यावर्षी काळविट तलावातील गाळ व स्वच्छ करण्याच्या कार्याबरोबरच वाशिम ‘ग्रिन ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  गतवर्षी देवतलाव स्वच्छता मोहीमेनंतर यावर्षी काळविट तलावातील गाळ व स्वच्छ करण्याच्या कार्याबरोबरच वाशिम ‘ग्रिन सिटी’ बनविण्यासाठी ‘ग्रीन वाशिम’ उपक्रम मी वाशिमकर गृपने हाती घेतला आहे. याच्या पहिल्याच सभेला वाढता प्रतिसाद पाहता प्रभावी नियोजन आखण्यात येत असून याला प्रशासनाचेही सहकार्य लाभत आहे.या संदर्भात १७ मे रोजी वाशिम येथे झालेल्या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेल्या विचारामधून वाशिम शहरात झाडे लावून ते जगवून शहरातील जास्तीत जास्त भाग हिरवेगार करण्याचा मानस मी वाशिमकर गृपच्यावतिने व्यक्त केला आहे. कोणतेही कार्य एकटया व्यक्तीने होवू शकत नाही हे सर्वश्रृत आहे. परंतु यापूर्वी वाशिमकर गृपने देवतलावाच्या कार्यात मिळालेला लोकसभाग, प्रशासनाचे सहकार्यामुळे कोणतीही गोष्ट शक्य नसल्याचे दाखवून दिले होते. त्याकरिताच हा पुढील अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतूक होत असून स्वयंस्फुर्तीने नागरिक सहभागी होतांना दिसून येत आहेत. अनेक नागरिक या उपक्रमाची विचारणा करुन त्यात सहभागी होण्याचे बोलत आहेत. या उपक्रमाची सर्वांना माहिती व्हावी, नियोजनाबाबत विचार विनिमय व्हावा याकरिता मी वाशिमकर गृपच्यावतिने १९ मे रोजी सायंकाळी ८.३० वाजता मंत्री पार्क परिसरात असलेल्या प्रसिध्द श्री साई मंदिराच्या ध्यान मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सहभागी नागरिकांना हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी विचार मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी देवतलावाच्या कार्यास सुरुवात केल्याबरोबर जोहरभाई नामक व्यक्तिने टिकास, फावडे, टोपले देवून आपला सहभाग दर्शविला होता, याहीवेळी त्यांनी सदर उपक्रमास सुरुवात होण्याआधिच शहरातील एका वसाहतीमधील संपूर्ण वृक्षाची देखभाल व संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतली. असेच कार्य सर्व वााशिमकर गृपचे सदस्य यशस्वीरित्या पार पाडत आहेत. स्वयंस्फूर्तीने नागरिकांचा प्रतिसाद वाशिमकर गृपच्यावतिने वाशिम सिटी ग्रीन करण्यासाठी हाती घेतलेल्या ग्रीन वाशिम उपक्रमासाठी स्वयंस्फुर्तीने नागरिक सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच सभेला प्रतिसाद पाहता दुसºया सभेचे आयोजन १९ मे रोजी साई ध्यान मंदिर वाशिम येथे करण्यात आले आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होवून या उपक्रमाबाबत धोरण आखण्यात येणार आहे. ओपन स्पेस एरिया बनणार ‘ग्रीन झोन’मी वाशिमकर गृपच्यावतिने हाती घेण्यात आलेल्या ग्रीन वाशिम उपक्रमातर्गंत शहरात असलेल्या वसाहतींमधील ओपन स्पेस झाडे लावून व ते जागवून तो संपूर्ण परिसरत ग्रीन झोन बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विशेष जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याने व प्रशासनाचेही सहकार्य लाभत असल्याने वाशिम शहर हिरवेगार बनण्यास वेळ लागणार नसल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक