शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भगिरथ प्रयत्न: ग्रामस्थांसाठी शेतातील पाणी आणले गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:36 IST

माजी ग्रामसेवक पी. के. चोपडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात असलेल्या विहिरीचे पाणी पाईपने गावात आणले.

भर जहागीरच्या चोपडे यांची समाजसेवालोकमत न्यूज नेटवर्कभर जहागीर(वाशिम): रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथे पाण्यासाठी हाहाकार सुरू झाला असून, ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्यासाठी माजी ग्रामसेवक पी. के. चोपडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात असलेल्या विहिरीचे पाणी पाईपने गावात आणले. स्वखर्चाने पाईपद्वारे गावातील विहिरीत पाणी टाकून ग्रामस्थांची तहान भागवित आहेत.रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ रखरखत्या उन्हात पायपीट करीत असल्याचे दिसत आहे. यात भर जहागीरचाही समावेश असून, या ठिकाणी पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. रात्रीबेरात्री शिवारातील विहिरीवरून पाणी आणून गरजा भागविल्या जात आहेत. पाण्यावाचून ग्रामस्थांचे सुरू असलेले हाल पाहून पी. के. चोपडे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी गावापर्यंत आणण्याचे ठरविले. त्यासाठी ६५ हजार रुपये खर्च करून ७ हजार फुट पाईप खरेदी केला आणि मोटरपंपद्वारे शेतातील विहिरीचे पाणी गावातील विहिरीत सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावकºयांची पाणीटंचाईची समस्या मिटल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  रिसोड तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र गतवर्षीच्या पावसाळ्यात रिसोड तालुक्यात खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांसह बहुतांश प्रकल्पही कोरडे पडून भुजल पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यात अपुºया पाण्यामुळे कृषी उत्पादनातही घट झाली असून, गुरांच्या चारापाण्यासह रोजगाराची समस्या गंभीर झाली आहे. पाणीटंचाई तीव्र झाल्यामुळे रिसोड शहरातील नागरिक टँकर विकत घेऊन तहान भागवित आहेत.  जलस्वराजच्या योजना निष्फळग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी शासनाच्यावतीने जलस्वराज योजना राबविल्या जात आहेत. गावागावांतील विहिरीवर मोटारपंप बसवून नळयोजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत आहेत. तथापि, जलस्वराज्य विहिरी कोरड्या पडल्याने या योजना निष्फळ ठरत आहेत. भर जहागीर येथील विहिरीतही ठणठणाट असल्याने येथील जलस्वराजची योजना बंद पडली असून, गावकरी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी