चौकशी झाल्याशिवाय ग्रामसेवकाची बदली करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:50 IST2021-09-09T04:50:05+5:302021-09-09T04:50:05+5:30

संबंधित ग्रामसेवकाची तक्रार करूनही ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नाही. त्यांचा फोन नियमितपणे बंद असतो. मागील सहा महिन्यांपासून मासिक सभा ...

Gramsevak should not be replaced without inquiry | चौकशी झाल्याशिवाय ग्रामसेवकाची बदली करू नये

चौकशी झाल्याशिवाय ग्रामसेवकाची बदली करू नये

संबंधित ग्रामसेवकाची तक्रार करूनही ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नाही. त्यांचा फोन नियमितपणे बंद असतो. मागील सहा महिन्यांपासून मासिक सभा न झाल्यामुळे गावामधील चौदाव्या वित्त आयोगामधील कामे हे कोणत्या ठरावानुसार होत आहे, हे कळणे अशक्य झाले आहे. सदस्यांना विश्वासात न घेता ही कामे सुरू आहेत. हिशेबामध्ये खूप मोठा आर्थिक गोंधळ असल्याची शक्यता आहे. गावातील नाली बांधकामाचे काम सुध्दा निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची पूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्यांची बदली करू नये.

यापूर्वीच्या ग्रामसेवकाकडून चौदाव्या वित्त आयोगाचे रेकॉर्ड अद्यापपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे कोरानाच्या काळातही गावात काम करण्यास ग्रामपंचायत असमर्थ राहिली. ग्रामसेवक भुसारी यांना हिशेबाची मागणी केली असता, ते स्पष्ट सांगतात की मागील ग्रामसेवकांनी रेकॉर्ड न दिल्यामुळे मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी सध्याच ग्रामसेवकाची बदली करू नये, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली.

Web Title: Gramsevak should not be replaced without inquiry