शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

ग्रामपंचायत सदस्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:42 IST

मलिदा ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येणाऱ्या दलित वस्ती रस्ता बांधकामावर अरुण तितीरमारे याने दलित समाजाचे ग्रामपंचायत सदस्य दिनेश गेडाम याला विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

ठळक मुद्देपोलिसांची बघ्याची भूमिका: कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मलिदा ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येणाऱ्या दलित वस्ती रस्ता बांधकामावर अरुण तितीरमारे याने दलित समाजाचे ग्रामपंचायत सदस्य दिनेश गेडाम याला विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असूनही पोलिसांनी अजुनपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही, अशी तक्रार सरपंच मनिषा गेडाम, दिनेश गेडाम, प्रफुल धुम्मनखेडे आदींनी पत्रपरिषदेतून केली असून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली.अरुण मारोती तितीरमारे हा दलित वस्ती रस्ता व नाली बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आला. त्याने दिनेश गेडाम यांना कामावर बोलावले. ग्रामपंचायत सदस्य दिनेश गेडाम हे प्रफुल धुम्मनखेडे यांच्यासोबत सुरू असलेल्या कामावर गेले असता मारोती तितीरमारे याने मागील पुढील कोणताही विचार न करता दिनेश गेडाम यांना जातीवाचक व अश्लील शब्दात शिविगाळ करून मारहाण केली. त्यावेळी कामावर उपस्थित लोकांची भांडण सोडविले. ही घटना २५ मार्च २०१८ ला सायंकाळी ५ वाजता घडली.ग्रामपंचयत सदस्य दिनेश गेडाम असून त्यांची पत्नी मनिषा गेडाम या मलिदा येथील सरपंच आहेत. अरुण तितीरमारे हा ग्रामपंचायतचा सदस्य किंवा पदाधिकारी नसताना ग्रामपंचायतच्या कामात ढवळाढवळ करतो. तो स्वत: गावाचा दादा असल्यासारखा भास निर्माण करून गावातील शांतता भंग करून आपआपसात भांडण लावण्याचे काम करीत असतो. दलित समाजाचे सरपंच व सदस्य असल्याने त्याने भांडण करताना दलित समाजाबद्दल अपशब्दांचा वापर केला व मारहाण केली. मलिदा गावातील नागरिक संज्ञान असून त्यांच्यात अजीबात जातीयवादाला धारा नाही. मात्र अरुण तितीरमारे हा गावात जातीय द्वेष पसरविण्याचा कार्य करीत आहे. दिनेश गेडाम यांना ठार मारण्याची भाषा वापरत असल्याने पोलिसांनी अरुण तितीरमारे याला त्वरीत अटक करावी, अशी मागणी पत्रपरिषदेतून सरपंच, सदस्य व काही ग्रामस्थांनी केली आहे.या प्रकरणात आंधळगाव पोलिसांनी अरुण मारोती तितीरमारे (४८) यांच्याविरूद्ध भादंवि ३२३, २९४, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन प्राप्त केलेला असल्याने जामिन रद्द होईपर्यंत अटक करता येत नाही.-विक्रम साळी, उपविभागीयपोलीस अधिकारी, तुमसर.