शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेतनश्रेणी, पेन्शनच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:01 IST

ग्रामपंचायतीच्या कर्मचारी व त्यांचे कुटुंब येत्या निवडणुकीत मतदान करणार नाही, तसेच काम बंद आंदोलन छेडून अधिवेशन काळातही आमरण उपोषण करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव  ( वाशीम):  तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाºया कर्मचाºयांना  वेतनश्रेणी व पेन्शन मिळण्यासाठी वारंवार आंदोलने झाली मात्र याचा काही फायदा झाला नाही अद्यापही अनेक कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचारी व त्यांचे कुटुंब येत्या निवडणुकीत मतदान करणार नाही, तसेच काम बंद आंदोलन छेडून अधिवेशन काळातही आमरण उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी आमदार अमित झनक यांना निवेदन दिले आहे.मालेगाव आणी रिसोड तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मध्ये काम करीत असलेल्या सुमारे ६० हजार कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या वीस वषार्पासून प्रलंबित आहे ग्रामपंचायत कर्मचाºयांना नियमित कर्मचाºयांप्रमाणे वेतन व पेन्शन मंजूर करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने मोर्चे केले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. ग्रामपंचायत कर्मचाºयांना नगरपंचायतच्या कर्मचाºयांप्रमाणे वेतनश्रेणी भत्ते, पेन्शन घेण्यासंदर्भात ठराव झाला होता, तसा अहवालही सादर केला होता सदर शिफारशी तपासून ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, असे ठरले होते मात्र अद्यापही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे सकारात्मक धोरण अवलंबून राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतन ग्रामपंचायत कर्मचाºयांना पेन्शन देण्यात यावे, डॉ. केळकर यांच्या समितीने सन २००९ मध्ये शासनास सादर केलेल्या अहवालानुसार ग्रामविकास विभागाने तात्काळ हा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील साठ हजार कर्मचारी व त्यांचे कुटुंब येत्या विधानसभा निवडणूकीत मतदान करणार नाही, तसेच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि अधिवेशन काळातहीआमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन रिसोड तालुक्यातील व मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने आमदार अमित झनक यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे रिसोड तालुकाध्यक्ष गंगाधर बोरकर, रिसोड तालुका सहसचिव सुनिल लोखंडे, रिसोड तालुका उपाध्यक्ष जमशेद पठाण, मालेगाव तालुका अध्यक्ष संजय नखाते, मालेगाव तालुका सचिव प्रमोद सांगळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनgram panchayatग्राम पंचायत