शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Gram Panchayat Election : लोकप्रतिनिधींच्या गावांतील लढती ठरणार लक्षवेधक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 11:22 AM

Gram Panchayat Election : लोकप्रतिनिधींच्या गावांतील लढतींकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. 

ठळक मुद्दे सत्ताधारी व विरोधक अशा दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागते. ग्रामीण भागात राजकारण ढवळून निघत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील नेते आदींच्या गावातील लढतींकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. गावस्तरावर ग्रामपंचायत निवडणूक हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्याने सत्ताधारी व विरोधक अशा दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागते. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, ग्रामीण भागात राजकारण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाऐवजी स्थानिक आघाडी, पॅनलच्या नावाखाली लढविली जाते. आमदार, सहकार क्षेत्रातील नेते, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्या गावातील लढती नेमक्या कशा होतील, या लढतींचे निकाल कुणाच्या बाजूने लागतील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 

जिल्हा परिषद आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या गावातील लढती 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सर्वश्री दिलीप जाधव यांचे जोडगव्हाण गाव (ता. मालेगाव), उषाताई चौधरी यांचे पार्डीटकमोर (ता.वाशिम), सोनाली जोगदंड यांचे हराळ (ता. रिसोड), जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांचे शिरपूर (ता. मालेगाव), माजी उपाध्यक्ष गजानन लाटे यांचे सवड (ता.रिसोड), विद्यमान सभापती शोभा सुरेश गावंडे यांचे रामतिरथ (ता.मानोरा), पंचायत समिती सभापती गीता संजय हरीमकर यांचे कवठा (ता.रिसोड), उपसभापती सुभाष खरात यांचे पळसखेड (ता.रिसोड), माजी जि.प. सभापती सुधीर पाटील गोळे यांचे केनवड (ता. रिसोड), माजी सभापती सुभाष शिंदे यांचे येवती (ता.रिसोड), माजी सभापती किसनराव मस्के यांचे वारला (ता.वाशिम), माजी पं. स. सभापती वीरेंद्र देशमुख यांचे काटा (ता.वाशिम) आदी ग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

जिल्हाध्यक्षांच्या गावातील लढती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांचे चिखली (ता.रिसोड), राकॉंचे माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांचे अनसिंग (ता.वाशिम), शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुधीर कव्हर यांचे तामशी (ता.वाशिम), राकॉंचे माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांचे शेलूखडसे (ता. रिसोड) या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

आमदारांच्या गावातील लढतीरिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या मांगूळझनक (ता.रिसोड) या गावात निवडणूक होत आहे. येथे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांच्या चिखली (ता.रिसोड) या गावातही निवडणूक होत असून, येथे २२ उमेदवार नशीब आजमावत आहेत.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकwashimवाशिम