शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

Gram Panchayat Election : परंपरागत चिन्हांनाच उमेदवारांची पसंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 11:42 IST

Gram Panchayat Election: अनेकांनी सिलिंडर, कपाट, टी.व्ही., कपबशी, फॅन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले.  

ठळक मुद्देयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निवडणूक आयाेगाने लॅपटाॅप, पेनड्राइव्ह, हेडफाेन यासारख्या आधुनिक काळातील निवडणूक चिन्हांना मान्यता दिली असली, तरी चिन्हवाटपात उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून आले. अनेकांनी सिलिंडर, कपाट, टी.व्ही., कपबशी, फॅन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांचीच निवड केल्याचे दिसून आले.  दैनंदिन वापरातील वस्तूंची चिन्हे ग्रामीण भागातील जनतेच्या परिचयाची असल्याने उमेदवारांनी त्यांना पसंती दिल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४ जानेवारी राेजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कारंजा ९५, मानाेरा १३१, रिसाेड २३३, वाशिम १९९, मालेगाव २२० आणि मंगरूळपीर येथील १५२ उमेदवारांनी माघार घेतली. सहा तालुक्यांतील १,०३० उमेदवारांनी माघार घेतल्याने १,४८७ जागांसाठी ३,२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.  निवडणूक आयोगाने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. त्यात भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे. पूर्वीच्या १५० चिन्हांऐवजी १९० निवडणूक चिन्हे आयाेगाने केली असली तरी उमेदवारांनी परंपरागत चिन्हांनाच पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

दैनंदिन वापरातील चिन्हेहेल्मेट, नेलकटर, मिक्सर, माइक, दुर्बीण, कढई, ब्रेड टोस्टर, उशी, फ्रीज, स्टॅपलर, सेफ्टी पीन अशा घरगुती व स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.सोबतच भेंडी, मका, वाटाणे, फुलकोबी, ढोबळी मिरची, आलं (अद्रक), हिरवी मिरची, अननस, कलिंगड, द्राक्षे, पेरू, नारळ अशा काही चिन्हांचाही समावेश करण्यात आला. 

प्रतिबंधात्मक आदेश लागूराज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. तसेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर १४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर १८ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक