शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Gram Panchayat Election : वाशिम जिल्ह्यात छाननी प्रक्रियेत १३६ अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:47 IST

Gram Panchayat Election: ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत १३६ अर्ज छाननीत बाद  झाले हाेते.  

ठळक मुद्दे१६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. आता नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यात ४,३२२ उमेदवारांनी ४,३९४ अर्ज दाखल केले. यानंतर ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत १३६ अर्ज छाननीत बाद  झाले हाेते.  जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (३० डिसेंबर) २९ डिसेंबरपर्यंत १४८६ जागांसाठी ४३२२ उमेदवारांनी ४३९३ अर्ज सादर दाखल केले. यामध्ये वाशिम तालुक्यातील ७२०, रिसोड तालुक्यातील ९८४, मालेगाव ८६८, मंगरूळपीर ६२६, कारंजा ६०४ आणि मानोरा तालुक्यातील  ५९१ उमेदवारी अर्जांचा समावेश होता. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक विभागाकडून ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अर्ज छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत मानाेरा व कारंजा तालुकयातील २३ अर्ज बाद ठरले. यामध्ये मानाेरा तालुक्यातील १७, कारंजा ६, मालेगाव २४, वाशिम ३४, रिसोड ४३ तर मंगरूळपीर तालुक्यात ९ वाजेपर्यंत १२ अर्ज बाद झाले होते. ईतर तालुक्यातील अर्ज छानणी सुरु हाेती.

आता लक्ष माघारीकडे जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया ३१ डिसेंबर रोजी पार पडल्यानंतर आता नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ४ जानेवारी रोजी दुपार ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार असून, नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार आहेत. ते स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ग्रामस्थांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे उमेदवारांच्या माघारीकडे लक्ष लागले आहे.  

४ जानेवारीला उमेदवार यादी हाेणार प्रसिध्दजिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींसाठी ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेची अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्यकता असल्यास १५ जानेवारी  २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. तसेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, २१ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक