शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

राज्यपालांनी कारंजात घेतले गुरु माऊलींचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 6:04 PM

Governor Bhagatsing Koshyari visits Guru Mauli in Karanja : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीर अर्थात गुरु मंदीराला भेट देन गुरु माऊली चरणी माथा टेकला.

वाशिम: आपल्या दोनदिवसीय विदर्भ दौऱ्यावर असलेले  राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी शनिवारी कारंजातील जगप्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीर अर्थात गुरु मंदीराला भेट देन गुरु माऊली चरणी माथा टेकला. यावेळी संस्थानच्यावतीने त्यांचा गुरु माऊलीची मूर्ती, प्रमाणपत्र, प्रतिमा, गुरुचित्र पोथी, सवळ देऊन सत्कार करण्यात आला. विदर्भाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचे शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास  जिल्ह्यात आगमन झाले.  त्यांनी शिरपूर येथील जगप्रसिद्ध अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिरात दर्शन घेतले.  त्यानंतर वाशिम येथे शासकीय विश्रामगृहात अधिाकाऱ्यांशी विविध विषयावर संवाद साधला.  त्यानंतर  कारंजा येथे गुरुमंदिराला भेट देऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. 

यावेळी विश्वस्त मंडळाच्यावतीने आशा सोनटक्के, सुरेखा घुडे, स्मिता बरडे, मिनाक्षी खेडकर, श्रद्धा घुडे यांनी त्यांचे स्वागत केले, तर वेद पाठशाळेच्या विद्द्यार्थ्यांनी शांतीपाठ  करून राज्यपालांना आशीर्वाद दिले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण खेडकर यांच्यासह वसंत स्वस्तकर, विनायक सोनटक्के, दिगंबर बरडे, कृष्णराव नांदेडकर, प्रकाश घुडे, अविनाश खेडकर, अतुल बरडे, निलेश घुडे आदिंची उपस्थिती होती. गुरुमाऊलीचे दर्शन घेऊन आपण धन्य झालो, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले, तसेच गुरुमाऊली सर्व जगाचे कल्याण करो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. राज्यपालांसोबत कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटण होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक गोरख झामरे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त राज्यपालांच्या दोऱ्यानिमित्त कारंजा पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक  बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. गुरु मंदीर परिसरासह वाशिम ते कारंजा मार्गावर मुख्य गावांच्या चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीKaranjaकारंजा