शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मागास जिल्हे प्रगत करण्यावर शासनाचा भर; वाशिमसह ४ जिल्ह्यांचा समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:44 IST

वाशिम : देशभरातील ११५ जिल्ह्यांचा मानव निर्देशांक तुलनेने कमी असून संबंधीत जिल्हे प्रगत करण्यासाठी शासनाकडून ‘कन्वर्जन्स इन्टिग्रेशन अँण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’, हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, गडचिरोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून यामाध्यमातून मानव निर्देशांक उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमानव निर्देशांक उंचावण्याचा प्रयत्न

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशभरातील ११५ जिल्ह्यांचा मानव निर्देशांक तुलनेने कमी असून संबंधीत जिल्हे प्रगत करण्यासाठी शासनाकडून ‘कन्वर्जन्स इन्टिग्रेशन अँण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’, हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, गडचिरोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून यामाध्यमातून मानव निर्देशांक उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मानव निर्देशांकात घसरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या सहकार्याने नीती आयोगाने कालबद्ध विकासाचे नियोजन केले आहे. याअंतर्गत मागास जिल्ह्यांमधील लोकांचे जीवनमान उंचावणे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगाराच्या सुविधा तसेच विकासाच्या दृष्टीकोनातून आवश्यक ठरू पाहणार्‍या योजनांची आखणी केली जाणार आहे. यासंदर्भातील जबाबदारी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांकडे सोपविण्यात आली असून संबंधित अधिकारीवर्गाने त्यादृष्टीने जिल्हांतर्गत भेटीचे सत्र देखील सुरू केले आहे. दरम्यान, राज्यात आजमितीस मानव निर्देशांक कमी असणारे १२ जिल्हे आहेत. मात्र, नंदूरबार, उस्मानाबाद, गडचिरोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांवर विकासाच्या दृष्टीने विशेष फोकस केला जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtraमहाराष्ट्र