शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:19 IST

Washim News दिवाळी संपल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसताना संबधितांचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  दिवाळी झाली असली तरी अनेक शासकीय कार्यालयामधील अनेक कक्ष अधिकारी, कर्मचारी वेळ हाेऊनही उपस्थित नसल्याचे लाेकमतने २० नाेव्हेंबर राेजी विविध शासकीय कार्यालयातील पाहणीवरुन दिसून आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यास साहेब आले नाही का विचारणा केली असता त्याने मात्र चुप्पी साधली हाेती.वाशिम शहरातील आरटीओ ऑफीस, पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, भूजल सर्वेक्षण कार्यालयाची २० नाेव्हेंबर राेजी सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान पाहणी केली असता अनेक कर्मचारी कर्तव्यावर आलेच नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात कायार्लयात हजर असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास विचारणा केली असता साहेब आले नसल्याचे सांगण्यात आले. दिवाळी संपल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसताना संबधितांचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

कार्यालयात शुकशुकाटवाशिम शहरातील आरटीओ (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय) येथे २० नाेव्हेंबर राेजी १० वाजून ५४ मिनिटापर्यंत अनेक अधिकारी कर्मचारी हजर झाले नव्हते. येथे हजर असलेल्या एका कर्मचाऱ्यास विचारणा केली असता त्याने काहीही न सांगता निघून गेला. या कार्यालयातील अनेक कर्मचारी हे बाहेरगावाहून येत असल्याने अनेकदा वेळेवर पाेहचत नसल्याचे चित्र आहे.

११ वाजेपर्यंत कर्मचारी नाहीवाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अनेक कर्मचारी ११ वाजेपर्यंत कार्यालयात पाेहचले नसल्याचे दिसून आले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने कार्यालय उघडून माेबाईलमध्ये मश्गुल असल्याचे दिसून आले. कार्यालयात दाेन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काेणीही दिसून आले नाही. काही जण येऊन परत गेल्याचे समजले.

कार्यालय उघडे, आत काेणी नाहीवाशिम येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रा कार्यालयात ११ वाजून ०३ मिनिटापर्यंत कर्मचारी आलेले दिसून आले नाहीत.  केवळ एक कर्मचारी आतमध्ये हाेते. या कार्यालयात नागरिकांचे कामे पडत नसल्याने येथे गर्दी राहत नाही याचा फायदा घेत कर्मचारी वेळेवर हजर हाेत नसल्याची पुढे आले. अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसताना याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी