शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शासकीय कर्मचाऱ्याने घेतला कर्जमाफी योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 16:37 IST

Risod News रिसोड पंचायत समितीमधील वरीष्ठ लिपीकाने कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाचे नियम धाब्यावर बसवुन रिसोड पंचायत समितीमधील वरीष्ठ लिपीकाने कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला. याची चाकोली येथिल गजानन परशराम गरकळ यांनी संबंधिताकडे तक्रार करुन शासनाच्या कर्जमाफीचा चुकीच्या पध्दतीने लाभ घेणा-या  कर्मचा-यावर कारवाईची मागणी केली हाेती. यावर चाैकशीअंती सदर कर्मचाऱ्याने या याेजनेचा लाभ घेतल्याचे सिध्द झाले असून त्याजवळून कजार्च्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येणार आहे. तालुक्यातील चाकोली येथिल सेवासहकारी संस्थेचे सभासद आणि रिसोड पंचायत समिती मधील कार्यरत वरीष्ठ  लिपीक रंगराव लहाणुजी गरकळ यांनी सन.२०१२-१३ मध्ये सेवा सहकारी संस्था चाकोली कडुन सुमारे ४४९०० रूपयांचे पिक कर्ज घेतले होते.त्या रक्कमेचे व्याज २३०९० रूपये झाले.अशा प्रकारे एकुण ६७९९० रूपये झाले.त्यानंतर सन २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना जाहीर झाली.यामध्ये शासकीय  कर्मचा-यांना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्ट  आसतांना तरी सुध्दा रिसोड पंचायत समिती मधील कार्यरत आसलेले वरीष्ठ  लिपीक रंगराव लाहनुजी गरकळ यांनी स्वतः कर्जमाफीचा लाभ मिळन्यासाठी अर्ज करित अंगठा लावुन कर्ज माफीचा लाभ घेतला.गजानन गरकळ यांच्या तक्रारीवरुन संबिधतांनी चाैकशी केली असता सिध्द झाल्याने त्यांच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी संबधितांनी सूचना केल्या आहेत.

सदर कर्मचारी यांनी सन २०१७-१८ मध्ये शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतल्याचे चौकशी दरम्यान सिध्द झाले आहे.प्रथम कर्जाच्या रक्कमेची व्याजासह भरणा करून नंतर सदर व्यक्ती वर नियमानुसार  कारवाई केल्या जाईल.- एम.बी. बन्साेडेसहाय्यक निबंधक , रिसाेड

मी याेजनेचा लाभ घेतला असल्याने ते पैसे मी उदया बॅंकेत भरणार आहे.- रंगराव लहानुजी गरकळ

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडgovernment schemeसरकारी योजना