शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 16:14 IST

गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी २२ जुलै रोजी स्थानिक पुसद नाका येथे सकाळी ११ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बोगस जात वैधता प्रमाणपत्रधारकांना प्रतिबंध करणे, खोटी प्रमाणपत्रे मिळविणाºयांविरूद्ध कारवाई करावी यासह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी २२ जुलै रोजी स्थानिक पुसद नाका येथे सकाळी ११ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गात मोडणाºया व्यक्तींना घ्यावयाचे लाभ किंवा संरक्षण या प्रवर्गात न मोडणाºया व्यक्ती जातीचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून मिळवित असल्यामुळे खºया मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाºया व्यक्तींवर अन्याय होत आहे. या प्रकारामुळे मागासप्रवर्गात मोडणाºया खºया व्यक्ती लाभ, सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप यावेळी गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी केला. खोटे प्रमाणपत्र आढळल्यास दक्षता अधिकारी, जात दाखले देणारे अधिकारी आणि वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बनावट कागदपत्र बनविणे, सादर करणे, त्याचा वापर करणे, संघटीतरित्या लाभ घेणे, महसुली पुरावे यामध्ये खोडाखोड करणे, बदल करणे, फेरफार करणे, शालेय व वास्तव्याचे बनावट पुरावे सादर करणे, अफरातफर, संगनमत आदी गुन्ह्याबाबत संबंधितांवर भादंवी कलम ४२०, ४६२, ४६५, ४७१ या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, काही नव्याने रक्तनाते संबंध दाखवून मागासप्रवर्गात घुसखोरी करणाºयांचा शोध घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.  मागासवर्गीयासांठी असलेली अनुदाने, कर्जे अशा बोगस लाभार्थींनी लाटलेली आहेत. यासाठी सर्व स्तरावर शोध मोहिम राबविण्यात यावी  आदी मागण्यांसाठी गोर सेनेने पुसद नाका चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास चालले्ल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात गोर सेनेचे जिल्हा सचिव नीलेश राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन