शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे ! : 'स्वाभिमानी' च्या पदाधिकाऱ्यांनी केली आरती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:43 IST

स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहरात ‘सीए चषक’संदर्भात एका ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाखाली आरती करून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव (वाशिम) : एकिकडे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यावर बोलायला सरकार तयार नाही. मात्र, एखाद्या उत्सवाप्रमाणे ‘सीएम चषक’ महाराष्ट्रात साजर केला जात आहे, असा आरोप करीत स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहरात ‘सीए चषक’संदर्भात एका ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाखाली आरती करून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. दूध फेकून देऊन ‘सीएम चषका’चा निषेध नोंदविला. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, स्प्रिंकलर ड्रीपचे पैसे नाही, मालाला हमीभाव नाही, जिल्हा दुष्काळग्रस्त नाही, लाखो रुपये दराची जमीन असून एकरी ५० हजार रुपये कर्ज वाटप नाही; मात्र चषकाचे उदघाटन करायला आमदार, खासदार हे थाटामाटात येतात, असा आरोप करीत शेतकºयांच्या मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष इंगोले यांनी दिला.

शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी मालेगाव बंद !

शेतकऱ्यांच्या विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवार, ३१ डिसेंबर रोजी पुकारलेल्या मालेगाव शहर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.शासनाने शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये कर्जवाटप तात्काळ करावे, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दामदुप्पट भाव देण्यात यावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहर बंदची हाक दिली होती. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत बहुतांश व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद  ठेवली होती. मात्र दुपारी २ वाजेनंतर व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने उघडल्याने बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. 

टॅग्स :washimवाशिमSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन