वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने बालकांना ‘फ्लू’ची लस देण्याकडे काही पालकांचा कल दिसून येतो, तर काही पालक बिनधास्त आहेत. ‘फ्लू’ लस घ्या आणि बालकांना सुरक्षित ठेवा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांना दिला.
देशात मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत १८ तसेच १० वर्षांआतील मुलांना फारसा कोरोना संसर्ग झाला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र १८ वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग झाला.
दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने, थोडी धाकधूकही कायम आहे. तिसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली. कोरोनापासून बालकांचा बचाव म्हणून एन्फ्लुएन्झा लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्स व पीडियाट्रिक टास्क फोर्सने दिलेला आहे.
कंपनीनुसार या लसीच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत.