शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील इंगलवाडी, जयपूर सिंचन प्रकल्पांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:59 IST

कारंजा लाड (वाशिम): ‘फॉरेस्ट राईट अ‍ॅक्ट’चे प्रमाणपत्र अप्राप्त असणे व भुसंपादनाचा मुद्दा रखडल्याने प्रलंबित असलेल्या इंगलवाडी आणि जयपूर सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनस्तरावर हा तिढा सुटल्याने लवकरच प्रकल्पांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देआमदार पाटणी यांची माहितीप्रकल्पांची कामे होणार लवकरच सुरू

कारंजा लाड (वाशिम): ‘फॉरेस्ट राईट अ‍ॅक्ट’चे प्रमाणपत्र अप्राप्त असणे व भुसंपादनाचा मुद्दा रखडल्याने प्रलंबित असलेल्या इंगलवाडी आणि जयपूर सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनस्तरावर हा तिढा सुटल्याने लवकरच प्रकल्पांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी मंगळवारी दिली.इंगलवाडी येथील प्रकल्पासाठी जवळपास ३० हेक्टर जमिन भुसंपादीत करण्यात आली असून त्यात ई-क्लास, खाजगी तसेच वनजमिनीचा समावेश होता. या प्रकल्पासाठी ६३८ लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला होता. तसेच कामाला सुरूवात देखील झाली होती. मात्र, केवळ ७ हेक्टर वनजमिनीअभावी हा प्रकल्प रखडला होता. वाशिम तालुक्यातील जयपुर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी शासनाने १४३.४९ कोटी रूपयास प्रशासकीय मान्यता दिली होती. जवळपास १९९ हेक्टर शेतजमीनीवर हा प्रकल्प उभारला जाणार असून केवळ २४.४२ हेक्टर वनजमीनीमुळे हा प्रकल्प देखील रखडला होता. दरम्यान, ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या, त्याचा मोबदला म्हणून लघु पाटबंधारे विभागाने महसुल विभागाकडे ३३.१५ कोटी रुपये अदा केले आहेत. यासंदर्भात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सलग पाठपुरावा केल्याने अखेर दोन्ही सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच प्रकल्पांची उर्वरित कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती आमदार पाटणी यांनी दिली.

टॅग्स :Damधरण