शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १७.७५ लाखांची फसवणूक !

By संतोष वानखडे | Updated: September 1, 2022 17:47 IST

पाच आरोपींवर गुन्हा : गोवर्धन येथील प्रकार

वाशिम (संतोष वानखडे)  : सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून १७ लाख ७५ हजाराने गोवर्धन (ता.रिसोड) येथील माजी सैनिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अनेकजण अभ्यास करून प्रयत्न करीत आहेत तर काही जण आर्थिक व्यवहार करून ‘शॉर्टकट’ मार्गाने सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांतून फसवणूकही होऊ शकते. 

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या तीन घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या होत्या. आता रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथील एका सुशिक्षित युवकासोबतही असाच प्रकार घडला आहे. गोवर्धन येथील उद्धव सदाशिव तहकिक हे माजी सैनिक असून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून आरोपींनी त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी उद्धव सदाशिव तहकिक यांच्याकडून १२ लाख ५० हजार रुपये व साक्षीदार वैभव राऊत यांचेकडून ५ लाख २५ हजार रुपये असे एकूण १७ लाख ७५ हजार रुपये घेऊन फिर्यादी व साक्षीदारास सरकारी नोकरीचे खोटे व बनावट ओळखपत्र व सरकारी नोकरीची ऑर्डर देऊन फसवणूक केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ५ आरोपी निष्पन्न झाले असून तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा वाशिमने तपासकामी ताब्यात घेतले असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने केली.

नागरिकांनो, फसवणुकीपासून सावध राहा

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या तीन घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. पैसे घेऊन सरकारी नोकरी मिळवून देतो असे सांगणाऱ्या लोकांपासून दूर राहून स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलाने केले. 

टॅग्स :jobनोकरीwashimवाशिमCrime Newsगुन्हेगारी