शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेलुबाजार येथील एटीएममधून निघताहेत जीर्ण, फाटक्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 15:03 IST

शेलुबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क फाटक्या, जीर्ण झालेल्या आणि रंग चढलेल्या नोटा निघत आहेत.

शेलुबाजार (वाशिम): ग्राहकांची कुठल्याही कामासाठी पैशांची अडचण वेळीअवेळी दूर व्हावी म्हणून विविध बँकांनी एटीएम सेवा सुरू केली; या एटीएममधून सुव्यवस्थीत चलनी नोटा निघणे आवश्यक आहे; परंतु शेलुबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क फाटक्या, जीर्ण झालेल्या आणि रंग चढलेल्या नोटा निघत आहेत. या नोटा व्यवहारांत कोणीही स्विकारणे अशक्य असल्याने खातेदारांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे.विविध बँकेच्या खातेदारांना वेळेवर रक्कम काढून आपली तातडीची अडचण दूर करण्यासाठी बँकांनी एटीएम सेवा सुरू केली. ही सेवा देत असताना निर्धारित विड्रॉल संख्येच्या मर्यादेनंतर खातेदारांकडून शुल्कही वसुल करण्यात येते. पहिल्या पाच विड्रॉलनंतर खातेदाराने त्याचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएम व्यतीरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून रक्कम काढल्यास हे शुल्क वसुल केले जाते. या एटीएमची सुरक्षा आणि त्यात रक्कम टाकण्याचे कंत्राट किंवा जबाबदारी बँकांनी विविध कंपन्यांकडे दिली आहे. या कंपन्यांना त्याद्वारे चांगले उत्पन्नही मिळते. त्यामुळे त्यांनी एटीएमधारकांना चांगली सेवा देणे अपेक्षीत आहे. तथापि, असे होताना दिसत नाही. अनेकदा एटीएममध्ये रक्कमच नसते, तर आता एक नवाच प्रकार शेलुबाजार येथील एटीएमधारकांना अनुभवायला मिळत आहे. शेलुबाजार येथील मुख्य चौकात स्टेट बँकेचे एटीएम केंद्र असून, यातील एटीएममशीनमधून ग्राहकांना चक्क जीर्ण झालेल्या, फाटक्या, रंग लागलेल्या, कागद चिकटलेल्या नोटा मिळत आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार ५०० रुपयांच्या नोटेबाबतच घडत आहे. या नोटा व्यवहारात कोणीही स्विकारण्यास तयार नाही. त्यामुळे अतिशय अडचणीच्या वेळी एटीएमचा आधार घेणाºया एटीएम कार्डधारकांची मोठी पंचाईत झाली आहे.  मंगळवारी या प्रकारामुळे चिडलेल्या एका खातेदाराने थेट एटीएम मशीन फोडण्याचाच निर्धार केला; परंतु तेथे उपस्थित ग्रामस्थ, व्यावसायिकांनी त्याची समजूत काढून शांत केले. दरम्यान, काही ग्राहकांनी याबाबत स्टेट बँकेच्या मंगरुळपीर शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना बोलावून त्यांच्या नोटा बदलून दिल्या आणि याबाबत संबंधित कंपनीला विचारणा करण्याचेही आश्वासन दिले.एटीएम शुल्कासह नोटा बदलण्याचाही भुर्दंडशेलुबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून निकामी नोटा निघत असल्याने संबंधित कार्डधारकांची पंचाईत झाली. त्यांना त्या बदलून देण्याची तयारीही मंगरुळपीर शाखेने दर्शविली; परंतु एटीएममधून रक्कम काढताना आधीच शुल्काचा भुर्दंड भरल्यानंतर त्यांना शेलुबाजार येथून मंगरुळपीरला खर्च करून जाण्याचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. त्यातच यासाठी जवळपास अर्ध्या दिवसाचा वेळ खर्च करावा लागत असल्याने शेलुबाजारचे एटीएम काय कामाचे, असा प्रश्न खातेदार उपस्थित करीत होते.

टॅग्स :washimवाशिमatmएटीएम