शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 18:49 IST

शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून सैलानीकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या वाहनाला नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा गावानजीक झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून सैलानीकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या वाहनाला नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा गावानजीक झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली. सर्व मृतक हे नागपूर येथील रहिवासी आहेत.एमएच ४९ बी ७०१९ क्रमांकाच्या झायलो गाडीने नागपूर येथील भाविक दर्शनासाठी सैलानीकडे होते. दरम्यान  नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा ता. मंगरूळपीर गावानजीक समोरून येणाºया एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि झायलो गाडी ही चार ते पाच वेळा रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात मुस्कान शे. सलीम (२३), वहिदा शे. गुलामनबी (४०), सलीमखान अब्दुल कासम (५०), रा. बडा ताज दर्गाह नागपूर हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी असलेल्या अलिया शे. इमरान (६), शे. हरीष शे. इमरान (७), शे. नाजीमा परवीन (२६) अलबिरा शे. इमरान (४) यांना उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. झायलो वाहनामध्ये एकाच कुटुंबातील ११ जण दर्शनासाठी सैलानीकडे जात होते. चालक शे. इमरान हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास शेलुबाजार चौकिचे पोलीस तसेच मंगरूळपीरचे पोलीस करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर एका मृतकाचे नाव कळू शकले नाही.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात