उंबर्डा बाजार ---- स्थानिक आरोग्यवर्धनी केंद्राच्या आवारातील समोरील भागात वैद्यकीय अधिकारी डाॅ.एस.आर. नांदे यांनी केलेल्या वृक्ष लागवडीनंतर कर्मचारी मंडळीच्या सहकार्याने वृक्ष संगोपन मोहीम राबविल्याने पावसाळ्याच्या दिवसात वनराई बहरली आहे.
उंबर्डा बाजार आरोग्यवर्धनी केंद्राच्या समोरील भागात वैद्यकीय अधिकारी डाॅ.एस.आर. नांदे यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी विविध प्रजातीच्या जवळपास १०० रोपट्यांची लागवड केली होती. या रोपट्यांना तणनाशकाच्या फवारणीसह वेळोवेळी खताची मात्रा दिल्याने अल्पावधीतच रोपट्यांची वाढ झाली.
लागवड केलेल्या बोअरवेलच्या पाण्यावर ठिबक सिंचनाची सोय करण्यात येऊन उन्हाळ्याच्या झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने काही कालावधी आधी लावलेली रोपटी वृक्षात रूपांतर पावसाळ्याचे दिवस असल्याने चांगलीच बहरल्याचे दिसत आहे.