शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दहा गुंठे क्षेत्रात फुलविले अडिचशे सागवानांचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:48 IST

वाशिम: पारंपरिक पिकांना फाटा देऊन अवघ्या १० गुंठे क्षेत्रात २५० सागवान वृक्षांची लागवड करून सुंदर असे रोपवन फुलविण्याची किमया मालेगाव तालुक्यातील शेतकरी मुरलीधर कोंगे यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पारंपरिक पिकांना फाटा देऊन अवघ्या १० गुंठे क्षेत्रात २५० सागवान वृक्षांची लागवड करून सुंदर असे रोपवन फुलविण्याची किमया मालेगाव तालुक्यातील शेतकरी मुरलीधर कोंगे यांनी केली आहे. त्यांचा हा प्रयोग पर्यावरणपुरक आणि इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.जिल्ह्यातील मानोरा तालुका वगळता इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडा मागास असलेल्या मालेगाव तालुक्यात शेतीत विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मात्र बºयापैकी आहे. या तालुक्यातील बºयाच शेतकºयांनी केवळ शेतीच्या बळावर आर्थिक विकास साधला आहे. अशा वेगळे प्रयोग करणाºया शेतकºयांत जामखेड येथील शेतकरी मुरलीधर कोंगे यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती असून, या शेतीत ते विविध पारंपरिक पिके घेतात. आता त्यांनी आपल्या शेतीपैकी १० गुंठे क्षेत्रात ९ महिन्यांपूर्वी २५० सागवान वृक्षांची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. प्रत्येक ५ चौरस फुट अंतर राखून त्यांनी सागवान वृक्षांची लागवड केली. यासाठी त्यांनी ब्रम्हा जातीच्या सागवान रोपांची निवड केली. ही झाडे जगविताना पाण्याची गरज असेल; परंतु पाण्याचा अपव्ययही होऊ नये आणि टंचाईमुळे रोपे सुकूही नयेत म्हणून त्यांनी ठिबक पद्धतीने रोपांना पाणी दिले. त्यामुळे रोपांना मोठा फायदा झाला आणि त्यांची झपाट्याने वाढ झाली. सद्यस्थितीत ही झाडे ९ ते १० फुट उंच झाली असून, हिरवीगार असल्याने मन मोहून घेत आहेत. ही झाडे लावल्यानंतर झाडांखालील जमीन मोकळी आणि हवा खेळती राहणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी घरच्या महिलांचे सहकार्य घेऊन स्वत: निंदण केले, डवरणी केली. रासायनिक खतांचा वापर टाळला. त्याचा मोठा फायदा वृक्षवाढीसाठी झाला. एक कोटी उत्पन्नाचा विश्वासमुरलीधर कोंगे यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या सागवान वृक्षांचा पर्यावरणाला फायदा होणार आहेच शिवाय या झाडांपासून त्यांना भरघोस उत्पन्नही मिळणार आहे. सद्यस्थितीत १० महिन्यांची झालेली ही झाडे १० वर्षे जगवून त्यांची योग्यपद्धतीने निगा राखल्यास मुरलीधर कोंगे यांना तब्बल १ कोटीचे उत्पन्न होण्याचा विश्वास आहे. अर्थात केवळ १० गुंठे क्षेत्रात प्रतिवर्षी १० लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळू शकणार आहे. त्यासाठी ते शास्त्रोक्त पद्धतीने झाडांना पाणी देणे, सेंद्रीय खतांचा वापर करण्यावर अधिकाधिक भर देत आहेत. पाटबंधारे विभागाकडून सत्कारपारंपरिक शेतीला फाटा देत १० गुंठे शेतात सागवान वृक्षांची लागवड करणारे आणि वनशेतीला प्राधान्य देणारे मुरलीधर कोंगे यांच्या कार्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. त्यांनी लागवड केलेल्या २५० सागवान वृक्षांची पाहणी करून जलसाक्षरात अभियान आणि पाटबंधारे विभागाच्यावतीने त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. लदूत रविंद्र इंगोले यांनी त्यांच्या शेतात जाऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिमFarmerशेतकरी