शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जखमी प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी वन विभागाचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:41 IST

वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देरस्त्यावर आल्यानंतर वाहनांच्या धडकेमुळे अपघात घडून काही प्राण्यांना जीव गमवावा लागतो, तर काही प्राणी जखमी होतात. उपचार करून त्यांना जंगलात सोडणे शक्य असते; परंतु गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांवर दीर्घ उपचार करणे आवश्यक असते. जखमी वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करता यावेत म्हणून त्यांना ठेवण्यासाठी वन्यजीव अनाथालय उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी अकोला विभागांतर्गत जागांची निवड करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, अकोला जिल्ह्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर आता वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे.प्रादेशिक वन विभाग अकोला अंतर्गत प्रादेशिक जंगलाचे प्रमाण लक्षणीय आहे. या जंगलात विविध जातींच्या वन्यजीवांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये प्रामुख्याने हरीण, चितळ, काळविट, निलगाय, भेकर, कोल्हा, रानडुक्कर या प्राण्यांची संख्या मोठी असून, अस्वल आणि बिबट्यांचे प्रमाणही चांगले आहे. हे वन्यप्राणी चारा-पाण्याच्या शोधात सतत इकडे, तिकडे भटकतात, अशात एखादवेळी रस्त्यावर आल्यानंतर वाहनांच्या धडकेमुळे अपघात घडून काही प्राण्यांना जीव गमवावा लागतो, तर काही प्राणी जखमी होतात. किरकोळ जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर जुजबी उपचार करून त्यांना जंगलात सोडणे शक्य असते; परंतु गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांवर दीर्घ उपचार करणे आवश्यक असते. अशा उपचारासाठी त्यांना ठेवण्याची व्यवस्था असणे गरजेचे असते. एक प्रशस्त इमारत आणि पिंजरे त्यासाठी आवश्यक असतात; परंतु अकोला वन विभागांतर्गत अशा सुविधांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उपचाराअभावी अनेक वन्य प्राण्यांचा जीवही गेला आहे. ही बाब लक्षात घेऊन जखमी वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करता यावेत म्हणून त्यांना ठेवण्यासाठी वन्यजीव अनाथालय उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील काम पूर्ण झाले असून, आता वाशिम जिल्ह्यात जागांची निश्चिती करण्यासाठी प्रादेशिक वन विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी वाशिम, मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यांची निवड झाली असल्याचे कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग