शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:52 IST

बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी वाशिममध्ये वास्तव्यास असलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगारांना आपापल्या घरी परतायचे आहे; मात्र रेल्वेचा प्रवास सद्या बंद आहे; तर एस.टी. बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे. या नियमामुळे हजारो नागरिक जिल्ह्यात अडकले आहेत.नियमबाह्य पद्धतीने ट्रकसह अन्य वाहनांमधून परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून प्रवास करित असलेल्या सुमारे दीड हजार मजूरांना काही दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी ठेवल्यानंतर प्रशासनाने विशेष रेल्वे, खासगी वाहनांनी त्या-त्या राज्याच्या सिमा व राज्यातील जिल्ह्यांमध्ये संबंधितांना रवाना केले. आता शासनाने एस.टी. परिवहन महामंडळाच्या बसमार्फत प्रवासी सेवा देखील उपलब्ध करून दिली; परंतु त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. बस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात थेट जाणार असून मधे कुठेही थांबणार नाही. यासह सुरक्षिततेच्या कारणास्तव बसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी बसविले जाणार नाहीत किंवा त्यापेक्षा कमी असतील तरी देखील बस उपलब्ध करून दिली जाणार नाही.तथापि, वाशिम जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागात परराज्य व अन्य जिल्ह्यांमधील अनेक नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगार वास्तव्यास आहेत; मात्र एकाच जिल्ह्यात किंवा एकाच राज्यात जाणाºया २२ प्रवाशांच्या एकाही गटाने अद्यापपर्यंत प्रशासनाकडे पास मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. एस.टी. परिवहन महामंडळाची बससेवा एकाच राज्याच्या सिमेवर किंवा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध असणार आहे. त्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासोबतच २२ प्रवासी संख्या असणे आवश्यक आहे. या नियमात बसणाऱ्यांनी प्रशासनाकडून पास मिळविण्याकरिता रितसर आॅनलाईन अर्ज केल्यास संबंधितांना परवानगी देण्यात येईल.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी