लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती विभागीय सहायक्त आयुक्तांच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या कनिष्ठ अभियंत्याविरूद्ध (निलंबित) सक्तीची सेवानिवृत्ती तर एका कनिष्ठ सहायकाविरूद्ध निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ६ मे रोजी केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली.जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता आर.एस. देशमुख यांच्यावर कर्तव्यात कसूर, आदेशाची अवहेलना करणे यासह गंभीर आरोप ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दोन आरोपांची चौकशी करण्यासाठी सदर प्रकरण विभागीय सहायक आयुक्तांकडे (चौकशी) चौकशीसाठी सुपूर्द केले होते. सहायक आयुक्तांच्या चौकशी अहवालात देशमुख यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्याविरूद्ध सक्तीच्या सेवा निवृत्तीची कारवाई करण्यात आली. दुसºया एका प्रकरणात महिला व बालकल्याण विभागातील कनिष्ठ सहायक अनिल धोंडू सुर्वे यांच्यावरही कर्तव्यात कसूर करणे, आदेशाची अवहेलना करणे, कार्यविवरण पंजी न ठेवणे, अनधिकृत गैरहजर राहणे आदी आरोप ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवायांमुळे कामचुकार कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहेत. अनिल सुर्वे यांना निलंबन कालावधीत पंचायत समिती वाशिम हे मुख्यालय देण्यात आले आहे.
कनिष्ठ अभियंत्याला सक्तीची सेवानिवृत्ती; कनिष्ठ सहायकाचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 18:00 IST