शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयातील खाद्य महोत्सवात रानभाज्यांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:30 IST

कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित  खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी  आनंद मेळावा साजरा केला या आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.

ठळक मुद्देया आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.रानभाज्यांमध्ये चाकवत, चवळी, अंबाडी, चिली, दाळिंबी, हेटा, चमकुरा, तांदुळजिरा, शेवगा, काठेमाठ, चोपडामाठ या भाज्यांचा समावेश होता. त्यासोबत तांदूळ, ज्वारी,बाजरी, मिसळीच्या विविध प्रकारच्या भाकरी खास आकर्षण होते.

 

कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित  खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी  आनंद मेळावा साजरा केला.या आनंद मेळाव्यात विविध   खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला .

दरवर्षी प्रमाणे यावर्षी जिल्हा परिषद विदयालय कामरगाव येथे आनंद मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होत.े या आनंद मेळाव्याचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांनी केले. संवेदना संस्था व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांचे पर्यावरण शिक्षण मित्र साहेबराव राठोड , भिमराव सुरडकर, पर्यवेक्षिका प्रेमलता पारवे, गोपाल खाडे उपस्थित होते. रानभाजी खाद्यमहोत्सवाच्या आयोजन निता तोडकर पर्यावरण शिक्षक यांनी मुख्याध्यापिका सुरेखा देशमुखा यांच्या मार्गदर्शनात केले होते .आनंद मेळाव्याचे आयोजन दिपाली खोडके,सोनाली ठाकरे, गोपाल खाडे,पुष्पा व्यवहारे, संजीवनी सोळंके, निर्मला शेरेकर, माधुरी दुधे, नीता तोडकर, विजया उगले, ममता जयस्वाल, शीतल काळे व पुरुषोत्तम दाहेदार यांनी केले होते.या आनंद मेळाव्यात जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.  तर रानभाज्या  खाद्यमहोत्सवामध्ये दहा विद्याथीर्नी आपला सहभाग नोंदविला.रानभाज्यांमध्ये चाकवत, चवळी, अंबाडी, चिली, दाळिंबी, हेटा, चमकुरा, तांदुळजिरा, शेवगा, काठेमाठ, चोपडामाठ या भाज्यांचा समावेश होता.या भाज्या विद्यार्थिनींनी बनवून आणल्या. त्यासोबत तांदूळ, ज्वारी,बाजरी, मिसळीच्या विविध प्रकारच्या भाकरी खास आकर्षण होते. विद्याथीर्नींनी पदार्थ कसे बनवायचे याबाबत सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली .

याशिवाय या भाज्यांची आपल्या जीवनामध्ये असलेले आरोग्यदायी महत्त्वसुद्धा विद्यार्थिनींनी इतरांना समजावून सांगितले.आनंद मेळाव्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते.कोणतेही काम कमी प्रतीचे नसते व श्रम करणा?्या लोकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण व्हावा,विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांची माहिती होऊन त्याचे महत्त्व त्यांना कळावे यासाठी या बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याबद्दल विद्यार्थी तथा शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशाची आयोजनकरीता शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी