कारंजा लाड -उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधून पाच लाख १३ हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना कारंजा शहरातील बायपास परिसरात १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
सुभाष चिनक रा. लोहगाव महागाव हे कारंजा येथील स्टेट बँकेमधून पाच लाख १३ हजार रुपये काढून गावाकडे निघाले असता बायपास परिसरात दुचाकीच्या डिकीमध्ये पैसे ठेवून त्या ठिकाणी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीकडे गेले. पती किराणा दुकानात सुपारी आणण्यासाठी गेले असता, एका अनोळखी इसमाने ५० रुपये खाली पडल्याचे पत्नीला सांगितले. पत्नीचे लक्ष तिकडे गेले असता, दुचाकीमधून पाच लाख १३ हजार रुपये घेउन अज्ञात चोरटा पसार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.