शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील पाच आरोग्य केंद्र होणार अद्ययावत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:58 IST

वाशिम :केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्ह्यात (ट्रांसफॉरमेशन आॅफ अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट) समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे

ठळक मुद्देअद्ययावत सोयी, सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच ६७ प्रकारची औषधी संबंधित रुग्णांना घरपोच उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुविधा अद्ययावत करण्यासाठी निती आयोगांतर्गत विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

वाशिम :केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्ह्यात (ट्रांसफॉरमेशन आॅफ अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट) समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. येथे अद्ययावत सोयी, सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच ६७ प्रकारची औषधी संबंधित रुग्णांना घरपोच उपलब्ध करून दिली जाणार आहे.केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्ह्यात वाशिमचा समावेश असून, ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुविधा अद्ययावत करण्यासाठी निती आयोगांतर्गत विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ सुरू केले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये केनवड, किन्हीराजा, शेलुबाजार, आसेगाव व शेंदूरजना या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रांत आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे व त्याअनुषंगाने साधनसामुग्री, ६७ प्रकारची औषधी उपलब्ध केली जाणार आहे. वैद्यकीय उपचाराच्या दृष्टिकोनातून येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळाही घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर यांनी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांना योग्य त्या सूचनाही दिल्या.उपरोक्त पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावातील कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासह अन्य आजारांवर योग्य ते उपचार मिळण्याच्या दृष्टिकोनातून आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. संशयित रूग्णांचा शोध घेतल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शिबिर घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. रुग्णाना संबंधित आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर योग्य ते उपचार करण्याबरोबरच आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरपोच मोफत औषधी दिली जाणार आहे. एकूण ६७ प्रकारची औषधी उपलब्ध राहणार आहे.

-तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची सुविधा‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी निवड झालेल्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांच्या उपचारासंदर्भात काही अडचण, शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधता यावा याकरीता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासंदर्भातची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.विविध प्रकारच्या तपासण्याही होणारएचआयव्ही यासह विविध आजारासंदर्भात योग्य त्या तपासण्या करण्यासाठी या पाच आरोग्य केंद्रांत अत्याधुनिक उपकरणे तसेच त्या अनुषंगाने तज्ज्ञ मनुष्यबळही उपलब्ध केले जाणार आहे.केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्'ात वाशिमचा समावेश आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. येथे अद्ययावत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी रुग्णांना आवश्यक ती औषधी आशा स्वयंसेविकांद्वारे घरपोच मोफत दिली जाणार आहे.- डॉ.अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम. 

 

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य