शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रच्या सीमेवर गर्भलिंग तपासणीचा गोरखधंदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:42 IST

स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा, या उद्देशाने गर्भलिंग निदानावर बंदी कायदा लागू करण्यात आला; मात्र आजही छुप्या पद्धतीने आंध्र प्रदेशात गर्भपात केला जात असून, जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय आहे. मोठी रक्कम घेऊन हे रॅकेट इच्छुकांना आंध्र प्रदेशात नेऊन  गर्भलिंग निदान चाचणी करत आहे.

ठळक मुद्देवाशिम, मालेगाव तालुक्यात दलालांचे मोठे ‘रॅकेट’ सक्रिय

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा, या उद्देशाने गर्भलिंग निदानावर बंदी कायदा लागू करण्यात आला; मात्र आजही छुप्या पद्धतीने आंध्र प्रदेशात गर्भपात केला जात असून, जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय आहे. मोठी रक्कम घेऊन हे रॅकेट इच्छुकांना आंध्र प्रदेशात नेऊन  गर्भलिंग निदान चाचणी करत आहे. प्रशासनानेही यासंदर्भात  दुजोरा दिला आहे. तथापि, ठोस पुरावे मिळत नसल्याने प्रशासनाचीही अडचण झाली आहे.मुलगाच हवा, या अट्टहासापोटी मोठय़ा प्रमाणात स्त्री भ्रूणहत्या केली जाते. यावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदा केला, तरीही काही ठिकाणी गर्भनिदान चाचणी केली जात आहे. आंध्र प्रदेशात चालणार्‍या एका गर्भनिदान केंद्रावर जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर इच्छुक जात असल्याची माहिती आहे. यासाठी  दलालांचे  एक रॅकेट सक्रिय असून, ते इच्छुकांना तेथे पोहचवते. गर्भवती महिलांना एका वाहनात बसवून त्यावर लग्नसोहळ्य़ाचे बॅनर  लावले जाते. त्यामुळे कुणाला शंका येत नाही. हे वाहन ठरावीक ठिकाणी पोहचण्याच्या काही अंतरावर पुरुषांना विशिष्ट ठिकाणी थांबवून फक्त गर्भवतींनाच केंद्रावर नेऊन चाचणी केली जाते. संबंधिताच्या इच्छेनुसार गर्भपात केला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी २0 हजारावर रक्कम इच्छुकाकडून हे रॅकेट उकळते आणि कुठेही वाच्यता न करण्याचा दम देते.  जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणांसमोर या रॅकेटचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे. 

अपेक्षित यश मिळाले नाही! ‘पीसीपीएनडीटी’ अर्थात गर्भलिंग तपासणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. काही मंडळी आंध्र प्रदेशच्या सीमेवर छुप्या मार्गाने चालणार्‍या गर्भलिंग तपासणी केंद्रात जात असल्याची माहिती प्रशासनालाही आहे. त्यावरून यापूर्वी तीन ते चार वेळा सापळा रचून या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न झाला. ‘पीसीपीएनडीटी’च्या सभांमध्येही या विषयावर अनेक वेळा चर्चा झाली; मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम

तक्रार दाखल होणे महत्त्वाचे!  गर्भवती महिलांना अवैधरीत्या गर्भलिंग तपासणीसाठी आंध्र प्रदेशमधील केंद्रावर नेले जात असल्याची चर्चा अनेकदा कानावर आली आहे. त्यानुषंगाने कारवाई करण्याचादेखील प्रयत्न झाला; मात्र जोपर्यंत नागरिकांकडून ठोस स्वरूपात आणि पुराव्यानिशी याप्रकरणी तक्रारी दाखल होत नाहीत, तोपर्यंत यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही.- जनार्दन जांभरूणकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम- 

टॅग्स :new born babyनवजात अर्भकCrimeगुन्हा