शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी वर्गाच्या इमारतींचे होणार ‘फायर सेफ्टी आॅडीट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:53 IST

नगर परिषदांनी शिकवणी वर्गाला नोटीस बजावून एका महिन्याच्या आत फायर सेफ्टी आॅडीट (अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण) करण्याच्या सूचना खासगी शिकवणी वर्गाला दिलेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गुजरात राज्यातील सुरत येथे शिकवणी वर्गातील आगीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिकवणी वर्गाची माहिती संकलित करून इमारतींचे ‘फायर सेफ्टी आॅडीट’ झाले किंवा नाही, याची माहिती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना दिले आहेत. त्याअनुषंगाने तपासणी केली जात आहे.सुरत येथील शिकवणी वर्गाला आग लागल्यामुळे काही विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये म्हणून रिसोडसह अन्य काही नगर परिषदांनी शिकवणी वर्गाला नोटीस बजावून एका महिन्याच्या आत फायर सेफ्टी आॅडीट (अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण) करण्याच्या सूचना खासगी शिकवणी वर्गाला दिलेल्या आहेत.  दरम्यान यासंदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बुधवारच्या सभेतही अशासकीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित करून शहरी भागात सुरु असलेल्या खाजगी शिकवणी वर्गाच्या इमारतींचे फायर सेफ्टी आॅडीट करण्यात यावे, अशी मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी सर्व नगरपरिषद मुख्याधिकाºयांनी आपापल्या शहरात सुरु असलेल्या खासगी शिकवणी वर्गाची माहिती संकलित करावी तसेच शिकवणी वर्गाच्या इमारतींचे फायर सेफ्टी आॅडीट झाले आहे किंवा नाही, याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या.जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा व मालेगाव या प्रमुख सहा शहरांमध्ये जवळपास १५० पेक्षा अधिक खासगी शिकवणी वर्ग आहेत. प्रत्येक शिकवणी वर्गाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतीचे फायर सेफ्टी आॅडीट हे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय योजना नियम २००६ प्रमाणे महाराष्ट्र अग्निशमन सेवा, मुंबई यांनी नोंदणीकृत केलेल्या परवानाधारक संस्थेकडून करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश शिकवणी वर्गाने याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाºयांनी नगर परिषदांना पडताळणी करण्याचे निर्देश दिल्याने यंत्रणा कामाला लागली आहे. फायर सेफ्टी आॅडीट न करणाºयांविरूद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिकाfireआग