शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राजुरा येथील गोडाऊनला आग; २० लाखांचे साहित्य जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:12 IST

राजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली. यामध्ये समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचाही समावेश आहे. राजुरा ते खैरखेडा मार्गावरील अनसिंग फाटयावर अमित शिवाजीराव घुगे यांच्या मालकीचे साई एजन्सीच्या माल साठविण्याचे गोडाऊन आहे. घुगे यांच्याकडे नामांकित कंपनीबरोबरच गावातीलच समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठीची एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून उत्पादित कंपन्याचे बर्फी, गुलाब जामून, चॉकलेट, चिवडा, बिस्कीट, लोणचे, मॅगी, नुडल्स, ब्रेड, केक यासह इतरही उत्पादने वाशिम, अकोला जिल्हयातील शहरे व गावात दररोज वितरीत केल्या जातात. विविध प्रकारचा हा माल तसेच कापूस व शेतीपयोगी साहित्यही गोडावूनमध्ये ठेवले होते. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान गोडावूनमधून वितरणासाठीची गाडी भरून देवून अमित घुगे घरी गेले असता, १० वाजतादरम्यान त्यांचे गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर शेतात असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने वाशिम येथील अग्निशामक दल यासह महसूल व पोलिस प्रशासनाला तात्काळ कळविण्यात आले. मात्र अग्निशामक दलाची गाडी पोहचविण्यापुर्वीच गोडावूनमधील माल पुर्णत: जळून खाक झाला होता. घुगे यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.यामध्ये अमित घुगे यांचे जवळपास २० लाख २७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी नागेशराव घुगे यांनी वरिष्ठांकडे सादर केला आहे. घटनास्थळावर तलाठी नागेशराव घुगे, पोलिस पाटील डॉ.धनंजय राजुरकर, बिट जमादार उत्तम राठोड, पोलिस कर्मचारी पाटील यांचेसह ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. 

समर्थ बचत गटही आर्थिक संकटात राजूरा येथे कार्यरत समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला माल हा साठवणुकीसाठी घुगे यांच्या गोडावूनमध्ये ठेवत असत. या आगीत त्यांचाही बराचसा माल जळून खाक झाल्याने बचत गटाच्या महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यापुढे कच्चा मालाच्या खरेदीसासाठी आर्थिक संकट ओढावल्याने महिला हतबल  झाल्याचे दिसून येते. रोजगारावरच पाणी फिरल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांना कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमfireआग