वाशिम: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट करण्यात आली असून, २०१३ ते २०१६ पर्यंतच्या इयता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना २०१३ ते २०१६ पासून पुढे या निर्णयांतर्गत वाढीव शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना ११ मे रोजी पत्र पाठविले आहे.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यृवत्ती परीक्षेत उत्तीर्ण नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५००, तिमाही १५००, सहामाही ३०००, तर वार्षिक ६००० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता यामध्ये शासनाने दुप्पट वाढ केली आहे. या निर्णयाचा लाभ २० नोव्हेंबर २०१६ रोजी परीक्षा देणाºया आणि पात्र ठरलेल्या नववीच्या विद्यार्थ्यांना, ७ जानेवारी २०१६ च्या परीक्षेतील पात्र दहावीच्या विद्यार्थ्यांना, १० जानेवारी २०१५ रोजीच्या परीक्षेतील पात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांना, तसेच १७ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या परीक्षेतील पात्र ठरलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांसह सन २०१७-१८ पासून पुढील चारही वर्गांच्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासंदर्भात शिक्षण संचालक पुणे यांनी सर्व जिल्हा परिषदांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या आयुक्तांना ११ मे रोजी पत्र पाठविले आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळून शिक्षण घेण्यातील त्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:01 IST
वाशिम: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट करण्यात आली असून, २०१३ ते २०१६ पर्यंतच्या इयता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना २०१३ ते २०१६ पासून पुढे या निर्णयांतर्गत वाढीव शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट
ठळक मुद्देदरमहा ५००, तिमाही १५००, सहामाही ३०००, तर वार्षिक ६००० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता यामध्ये शासनाने दुप्पट वाढ केली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळून शिक्षण घेण्यातील त्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.