शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसमोर आर्थिक पेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 13:34 IST

काही शिक्षकांनी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला तर काही शिक्षक आर्थिक संकटाशी दोन हात करीत वाटचाल करीत आहेत.

- संतोष वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एकिकडे कोरोना विषाणू संसर्गाचे संकट तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शाळाही बंद. अशा परिस्थितीत खासगी कॉन्व्हेंट, विनाअनुदानित शाळेवरील अनेक शिक्षकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामधून मार्ग काढत काही शिक्षकांनी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला तर काही शिक्षक आर्थिक संकटाशी दोन हात करीत वाटचाल करीत आहेत.यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाने सर्वांचेच नियोजन कोलमडले आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. तेव्हापासून शाळा बंद आहेत. सरकारी, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेवरील शिक्षकांना नियमित वेतन असल्याने त्यांना आर्थिक संकटाशी दोन हात करण्याची वेळ तुर्तास तरी आली नाही. परंतू, कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, खासगी कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक कोंडीतून जावे लागत आहे. काही शिक्षकांनी पर्यायी मार्ग शोधले आहेत. परंतू, लॉकडाऊनमध्ये त्यामधून फारशी मिळकत नसल्याच्या व्यथाही या शिक्षकांनी मांडल्या. गजानन लांभाडे नामक शिक्षकाने संगणक लॅबच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला. संगणक शिकविणे, आॅनलाईन अर्ज भरणे आदी कामे ते करीत आहेत. शिक्षकेतर कर्मचारी मिलिंद सरकटे हे किराणा दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. ज्ञानेश्वर मांडे यांनी वडीलोपार्जित शेतीला हातभार लावून आर्थिक संकटावर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शेलुखडसे व रायताळवाडी येथील शिक्षकाने आॅनलाईन पद्धतीने खासगी शिकवणी घेऊन आर्थिक संकटाशी दोन हात केले आहेत. लॉकडाऊलनच्या या काळात खासगी शिक्षकांना शासनाकडून एखाद्या ‘पॅकेज’ची अपेक्षा आहे.

अशा आहेत खासगी शिक्षकांच्या मागण्याशासनाने २० टक्के अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा. विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.शेतकरी पॅकेजच्या धर्तीवर कोरोनाचे संकट टळेपर्यंत विनाअनुदानित, कॉन्व्हेंटवरील शिक्षकांसाठी एखादे पॅकेज जाहिर करावे.सुशिक्षित बेरोजगारांना जसा भत्ता दिला जातो, त्याप्रमाणे खासगी शिक्षकांनाही या आर्थिक संकटाच्या काळात भत्ता देण्यात यावा.

विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांचा २० टक्के वेतन अनुदानाचा प्रश्न निकाली निघाला नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी पॅकेजच्या धर्तीवर शासनाने खासगी शिक्षकांसाठी पॅकेज जाहिर करून आर्थिक हातभार लावावा.- गजानन लांभाडे, शिक्षक

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक