शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अन् रामगाव बसफेरी धावू लागली नियमित ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:54 IST

बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा (वाशिम) : मंगरूळपीर आगाराची रामगाव बसफेरी अनियमित व वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होत असे. यामुळे विद्यार्थीनी व पालकांनी आक्रमक पवित्रा घेत २७ सप्टेंबर रोजी थेट मंगरुळपीरच्या आगारात धडक देत आगारप्रमुखांना निवेदन सादर करून बस वेळेवर सोडण्याची मागणी केली होती, तसेच लोकमतनेही २८ सप्टेंबरच अकांत  ‘बसफेरी अनियमीत; आक्रमक विद्यार्थींनीची आगारात धडक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून आगार प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन ही बसफेरी आता नियमित सुरू करण्यात आली आहे.  मंगरूळपीर आगाराची मंगरुळपीर-रामगाव ही अनेक गावातील प्रवाशासाठी एकमेव बस आहे. मानोली व मंगरूळपीर येथे शिक्षण घेण्याकरीता ६० मुली आणि १० मुले दररोज याच बसने प्रवास करतात; परंतु ही बस कधीकधी सायंकाळी उशिरा येत असल्याने मुलींना रात्रीचा प्रवास करावा लागत होता. त्यातच बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता; परंतु मानोली ते रामगाव हे अंतर ६ किलोमीटर असल्याने त्या मुलींना पायदळ प्रवास शक्य होत नव्हता. त्यातच रात्रीचा वेळ पाहून खाजगी वाहनधारक मनमानी प्रवासभाडे आकारतात. त्यामुळे मुली घरी येईपर्यंत पालक चिंताग्रस्त राहत होते. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थीनी आणि पालकांनी आक्रमक पवित्रा घेत २७ सप्टेंबर रोजी थेट मंंगरुळपीरच्या आगारात धडक दिली. यावेळी ५० विद्यार्थीनींनी बस वेळेवर सोडण्यासाठी आगारप्रमुखांना निवेदनही   दिले. बसफेरीच्या नियमिततेमुळे विद्यार्थीनींना सायंकाळच्या वेळी सहन करावा लागत असलेला त्रास, ही गंभीर बाब असतानाही आगार प्रशासन दखल घेत नसल्याने लोकमतने २८ सप्टेंबरच्या अंकात ‘बसफेरी अनियमीत; आक्रमक विद्यार्थींनीची आगारात धडक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून आगार प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन ही बसफेरी आता नियमित सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणाºया विद्यार्थीनींना मोठा दिलासा मिळाला असून, पालकवर्गातही समाधानाचे वातावरण आहे.  (वार्ताहर) 

ग्रामीण भागातील विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होवू नये.यासाठी आम्ही खूप काळजी घेतो. मात्र जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू असल्याने कधी कधी आमचाही नाईलाज होतो. रामगाव बसफेरी नियमित ठेवण्याचा प्रयत्न करू.       -जी. बी. झळके सहाय्यक वाहतूक निरीक्षक मंगरूळपीर आगार  

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी