शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अखेर व्यापारी संकुलातील अतिक्रमण काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 3:22 PM

नगरपरिषद प्रशासनासह नगराध्यक्ष आसनकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत १३ जानेवारी अतिक्रमण हटविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड नगर परिषदेच्या व्यापारी संकुलमध्ये काही जणांनी अतिक्रमण केले असतांनाही याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत असल्यासंदर्भात लोकमतच्यावतिने ११ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची ताबडतोब दखल घेत नगरपरिषद प्रशासनासह नगराध्यक्ष आसनकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत १३ जानेवारी अतिक्रमण हटविण्यात आले.रिसोड नगर परिषद जवळ असलेल्या व्यापारी संकुलामध्ये काहीजणांनी चक्क दुकानांच्या आत ताबा करुन अतिक्रमणधारकांनी या संकुलामध्ये आपले वास्तव्य सुरु केले होते. हे संकुल नगरपरिषदेने मागील दोन वषार्पासून बांधले असून काही तांत्रिक अडचणीमुळे याचा लिलाव न झाल्याने अतिक्रमकांनी आपला डेरा तेथे टाकला होता. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका सुरु असल्याने त्यामध्ये सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. निवडणुका संपल्याबरोबर अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. १३ जानेवारी रोजी नगरपालिका प्रशासनासह नगराध्यक्ष प्रा. विजयमाला आसनकर, नगरसेवकांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवून दुकानांना कुलूप लावण्यात आले. तसेच यानंतर येथे कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सांगण्यात आले. नगरपलिका व्यापारी संकुलात अतिक्रमण करणाऱ्यांना तेथून काढण्यात आले आहे. तसेच जी दुकाने संकुलातील खाली होती त्यांना सूध्दा कुलूप लावून टाकण्यात आल्याने आता अतिक्रमण होणार नाही. तरी सुध्दा व्यापारी संकुल परिसरातही कोणी अतिक्रमण केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.- प्रा. विजयमाला आसनकरनगराध्यक्ष, रिसोड नगर परिषद

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम