शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'सीसीआय'ला कापूस खरेदीचा मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:17 IST

CCI Cotton Purchasing News पहिल्या दिवशी जवळपास १०० क्विंटल कापूस मोजण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्रीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) शासकीय कापूस खरेदीला अखेर जिल्ह्यात मुहूर्त मिळाला आणि १९ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर येथील केंद्रावर सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली. बाजारात मिळणारे अल्पदर आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा फटका सहन करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. परिपक्व अवस्थेत आलेल्या या पिकास परतीच्या पावसाचा फटका बसला, तर काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर या पिकाला बोंडअळीने घेरले. त्यामुळे उत्पादनात घट आली. दुसरीकडे शासनाने लांबधाग्याच्या कापसाला ५८२५ रुपये प्रती क्विंटल, तर मध्यम धाग्याच्या कापसाला ५५२५ रुपये प्रती क्विंटल दर घोषीत केला असताना बाजारात व्यापाऱ्यांकडून जेमतेम ५ हजार रुपये प्रती क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात होती. त्यामुळे शेतकरी शासकीय कापूस खरेदीची प्रतीक्षा करू लागले होते. लोकमतने जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेच्या तयारीबाबत वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यात जिल्ह्यात केवळ ३ खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने यंत्रणेवर ताण येणार असल्याचेही नमूद केले अखेर. आता जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदीला सीसीआयने गुरुवारी सुरुवात केली. तथापि, मंगरुळपीरमध्येच ही खरेदी सुरू झाली असून. अद्याप कारंजा आणि अनसिंग या ठरलेल्या केंद्रांवर कापूस खरेदी सुरू झाली नाही. मंगरुळपीर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा मंगरुळपीर बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांच्या उपस्थितीत बाजार समिती सचिव रामकृष्ण पाटील, बबन मिसाळ, संजय जाधव, सीसीआयचे प्रतिनिधी उमेश तायडे, जिनिंग-प्रेसिंगचे जुगलकिशोर बियाणी यांच्या उपस्थितीत खरेदीला सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवशी जवळपास १०० क्विंटल कापूस मोजण्यात आला.

सीसीआयच्या कापूस खरेदीला मंगरुळपीर येथे सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोजणीचे नियोजन केले असून, एसएमएस पाठवून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कापूस आणण्याच्या सुचना दिल्या जातील. सद्यस्थितीत मंगरुळपीर, कारंजा आणि अनसिंग येथे बाजार समितीत कापसाची नोंदणी केली जात आहे.-उमेश तायडे, सीसीआय केंद्रप्रमूख, मंगरुळपीर

टॅग्स :cottonकापूसwashimवाशिम