शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ग्रामसचिवांकडील अतिरिक्त प्रभार काढला

By admin | Updated: June 19, 2014 22:09 IST

लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वाशिम पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी तातडीने ग्रामसेवकाकडील पाच गावातील अतिरिक्त प्रभार काढण्याची कारवाई केली आहे.

पांडवउमरा : वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या ह्यएकाच ग्रामसचिवाकडे पाच गावांच्या कामाचा बोजाह्ण या मथळयाखाली १४ जून २0१४ रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वाशिम पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी बदरखे यांनी तातडीने माने नामक ग्रामसेवकाकडील पाच गावातील अतिरिक्त प्रभार काढण्याची कारवाई केली आहे.वाशिम पंचायत समिती अंतर्गतच्या ग्रामसचिवांकडे समान गावांची जबाबदारी सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली होती. काही ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासल्या गेला होता. याबाबत ह्यलोकमतह्णने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तान ेपंचायत समिती प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. याची दखल घेत प्रभारी गटविकास अधिकारी बदरखे यांनी ग्रामसचिवांकडील अतिरिक्त प्रभार काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे.माने नामक ग्रामसेवकाकडील पाच गावातील अतिरिक्त प्रभार काढताना तांदळी शेवई-जनुना या गावांकरिता म.वा.कांबळे या ग्रामसचिवाला रुजू होण्याचे आदेश सुद्धा बदरखे यांनी दिले आहेत. माने नाम ग्रामससिवाकडे केवळ एकच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्वाला हरताळ फासला जात होता.शासनाच्या कल्यानकारी योजना गावपातळीवर पोहचवण्यासाठी आता पांउवउमरा सावंगा जहाँगीरच्या ग्रामसचिवाला बर्‍यापैकी वेळ मिळणार असल्याची माहिती आहे. पाच गावाचा कारभार पाहता पाहता एकाच सचिवाची दमछाक होत होती. शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कामाचे समान वाटप होणे आवश्यक असताना अनेक ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावाचा कारभार असल्याने उर्वरित ग्रामसचिवांकडे प्रकरणाच्या पेंडीगची संख्या वाढणार असल्याचे माहिती आहे. तीन ग्रामसचिवाना कार्यालयीन कामकाजासाठी घेतले कसे या प्रश्नाचे उत्तर मात्र सध्यातरी अनुत्तरीय आहे.