शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पीक नुकसानाचे अंतीम अहवाल अद्याप अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:52 IST

पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

- सुनील काकडेवाशिम : १५ ते १७ आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा या दोन तालुक्यातील खरीप पिकांना जबर फटका बसला. त्यामुळे हजारो शेतकरी बाधीत झाले असून त्यांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळणे आवश्यक ठरत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाने बाळगलेली कमालीची उदासिनता आणि तहसील स्तरावरून अद्याप (११ सप्टेंबर) पीक नुकसानाचे अंतीम अहवालच प्राप्त झाले नसल्याने हे अहवाल शासनापर्यंत कधी पोहचणार आणि शेतकºयांना मदत कधी मंजूर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षी पावसातील अनियमिततेमुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामापासून शेतकºयांना विशेष उत्पन्न घेता आले नाही. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने पीकपरिस्थिती बºयापैकी आहे; परंतु आॅगस्ट महिन्यातील १५ ते १७ तारखेदरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येवून हजारो हेक्टरवरील पीके नेस्तनाबूत झाली. अनेकांच्या शेतजमिनी पूर्णत: खरडून गेल्या. यादरम्यान महसूल प्रशासनाने प्राथमिक स्वरूपात केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, जोपर्यंत अंतीम अहवाल तयार होवून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविले जात नाहीत, तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देखील मंजूर होणार नाही. असे असताना कारंजा व मानोरा तहसील स्तरावरून पीक नुकसानाचे अंतीम अहवाल पाठविण्यासंदर्भात प्रचंड दिरंगाई केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही हवा तसा पाठपुरावा नसल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून शेतकºयांमधून याप्रती तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्हाधिकाºयांना नुकसानाची कल्पनाच नाही!वाशिमचे विद्यमान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना यासंदर्भात छेडले असता, त्यांच्या बोलण्यातून आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची त्यांना पुरेशी कल्पनाच नसल्याचे जाणवून आले. यासंदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे अंगुलीनिर्देश करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकºयांप्रती जिल्हा प्रशासनही किती जागरूक आहे, याचा प्रत्यय आला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती