शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण!

By admin | Updated: July 17, 2017 02:39 IST

सावरगाव येथील घटना : आरोपी भावावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वडिलांनी दोन भावांमध्ये शेतीची हिस्सेवाटणी करून दिली; परंतु त्यावर समाधान न मानता दिव्यांग असलेल्या भावाच्या हिश्शातील दोन गुंठे शेती मिळविण्याच्या हव्यासापायी एका धडधाकट इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाला मारहाण केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी १६ जुलै रोजी आरोपी भावाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.पंढरी रामभाऊ कड (वय ४५ वर्षे, रा. सावरगाव बर्डे, ता. वाशिम) यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की माझा लहान भाऊ पांडुरंग रामभाऊ कड हा बायका-पोरांसह घराशेजारीच वास्तव्याला आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून तो शेती वाटपाच्या मुद्यावरून मला व वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या धमक्या द्यायचा. त्याला माझ्या हिश्शातून दोन गुंठे जमीन पाहिजे आहे. मी व वडिलांनी त्याला अनेक वेळा समजावून सांगूनही तो त्याचा हट्ट सोडत नव्हता. दरम्यान, १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मी तीनचाकी सायकलने घरी निघालो असताना पांडुरंगने जवळ येऊन मारहाण करायला सुरुवात केली. न मारण्याची विनवणी करूनही त्याने ऐकले नाही, तर जवळच पडून असलेल्या काठीनेही मारहाण केली. यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर सायकलसकट उलटे पाडले. यावेळी माझा मुलगा आणि माझा दुसरा भाऊ विठ्ठल कड हे धावत घटनास्थळी आल्यामुळे माझा जीव बचावला. पंढरी रामभाऊ कड यांनी दाखल केलेल्या अशा आशयाच्या तक्रारीवरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी आरोपी पांडुरंग रामभाऊ कड याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.