शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दोन गटात मारहाण; ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 16:18 IST

वाशिम : शहरातील पुसद नाकास्थित व्यवसायाच्या जागेवरून उफाळलेल्या वादादरम्यान एकाच समाजातील दोन गटात मारहाण झाली. ३० मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल झालेल्या तक्रारींवरून पोलिसांनी ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील पुसद नाकास्थित व्यवसायाच्या जागेवरून उफाळलेल्या वादादरम्यान एकाच समाजातील दोन गटात मारहाण झाली. ३० मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल झालेल्या तक्रारींवरून पोलिसांनी ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सैय्यद गफ्फार सैय्यद लाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की माझे पुसदनाका येथे सदाबहार हॉटेल व रसवंतीचा व्यवसाय असून ३० मार्च रोजी हॉटेलमध्ये काम करणारे सैय्यद ईस्माईल सैय्यद लाल, सैय्यद जब्बार सैय्यद सत्तार हे हजर असताना शेजारी असलेल्या रंगीला हॉटेलवर काम करणारे शेख चांद शेख मन्नू, शेख मुस्तफा शेख मतीन, शेख वसीम शेख मन्नू, शेख कय्यूम शेख मन्नू, शेख जुनेद शेख ख्वाजा, शेख फयुम शेख चाँद यांच्यासह अन्य २० लोकांनी सदाबहार हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. तसेच शिविगाळ करून काठी, पाईपने मारहाण केली. यावरून नमूद आरोपींसह २० जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले. दुसºया गटाकडून मोहम्मद वसीम शेख चांद यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की पुसदनाका येथे माझे वडिल शेख चांद शेख मन्नू यांची स्वत:च्या मालकीची जागा असून गत ९ महिन्यांपासून ती भाडेतत्वावर सैय्यद शोएब सैय्यद शब्बीर यांना देण्यात आली. दरम्यान, ३० मार्च रोजी सैय्यद शोएब यांनी वडिलांना फोनवर कळविले की सदर जागेवर काही लोक टीन ठोकत आहेत. त्यावरून मी स्वत: त्याठिकाणी गेलो असता, सैय्यद आफ्रोज, मोहम्मद एजाज मोहम्मद सईद व सैय्यद गफ्फार सैय्यद लाल यांनी वाद घातला. रंगीला हॉटेलमध्ये तोडफोड करून मारहाण केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी दुसºया गटातील आरोपींविरूद्धही गुन्हे दाखल केले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी