शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या मागणीवरून महिला आक्रमक;  व्यक्त केला रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 18:14 IST

संतापलेल्या  महिलांनी बुधवार, १५ मे रोजी चक्क भांड्यांची आदळआपट करून प्रशासकीय धोरणांविरूद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला. 

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अन्य गावांप्रमाणेच देवठाणा खांब येथेही यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणी पुरविण्याची मागणी असताना प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे अखेर संतापलेल्या  महिलांनी बुधवार, १५ मे रोजी चक्क भांड्यांची आदळआपट करून प्रशासकीय धोरणांविरूद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला. घनदाट जंगलाने वेढलेल्या देवठाणा खांब या गावात दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे शासकीय टँकरने पाणीपुरवठा करावा लागला नाही, असे एकही वर्ष आतापर्यंत गेले नाही. उन्हाळ्याच्या दिवसात मानसांनाच प्यायला पाणी मिळत नाही, तिथे गुराढोरांचा काय टिकाव लागणार. यामुळे जानेवारी, फेब्रूवारी महिन्यातच गावातील पुरूष मंडळी आपापली दुधाळ जनावरे पाण्याची सोय असलेल्या इतर गावांमधील नातेवाईकांकडे सोडून येतात. तशीच विदारक स्थिती यंदाही उद्भवली आहे. गावाच्या चारही बाजूला घनदाट जंगल असून वन्यप्राण्यांचा सदोदित वावर असतो; मात्र अशाही बिकट स्थितीत डोईवर हंडा घेवून गावातील महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १६ गावांमध्ये आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला आहे; परंतु देवठाणा खांब येथे मागणी होवूनही अद्यापपर्यंत टँकर पोहचलेले नाही. यामुळे विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून टँकरच्या पाण्यासाठी तांड्यातील महिलांनी बुधवारी रस्त्यावर उतरून भांड्यांची आदळआपट करित आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात कांताबाई नारायण चव्हाण, शांताबाई फुलसिंग राठोड, गीता मोहन राठोड, बेबीबाई मांगीलाल जाधव, प्रयागबाई वामन तिवाले, मंदा नारायण हांडे, यमुना सिताराम राठोड, सुवर्णमाला गिरधर चव्हाण, वनिता सुखदेव राठोड, इंदू गोविंदा राठोड, सुशीला बबन राठोड, शितल दिनकर राठोड, सुमन आकाराम चव्हाण, अनुसया चव्हाण यांच्यासह इतर महिलांनी सहभाग घेतला.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई