शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहीर दुरूस्तीसाठी उपोषणाचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:38 IST

बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क बांबर्डा कानकिरड (वाशिम) : कारंजा तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकºयांच्या सिंचन विहीरी पूर्णपणे खचल्याने त्यांना सिंचन करणे कठिण झाले आहे. या संदर्भात संबंधित शेतकºयांनी कांरजा तहसीलदारांना निवेदन देऊनही दोन वर्षांंपासून सदर सिंचन विहीर दुरूस्तीसाठी आर्थिक मदत केल्या गेली नसल्याने शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. बांबर्डा येथील शेतकरी विनायक लक्ष्मण वानखडे व भास्कर शालिकराम कानकिरड यांची बांबर्डा शेतशिवारात सर्व्हे नं. ५/३ व सर्व्हे नं. ४५ मध्ये शेती असून त्यामध्ये सदर शेतकºयांच्या सिंचन विहिरी आहेत. तालुक्यात २०१६ च्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सिंचन विहीरी खचल्याने विहीरी संपूर्णपणे गाळल्या आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना सिंचन करणे कठिण झाले आहे. शासनाने अतिवृष्टीमुळे खचलेल्या सिंचन विहीरीची दुरूस्ती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेतून करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित शेतकºयांनी सिंचन विहीर दुरूस्तीसाठी दोन वेळा कारंजा तहसीलदारांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर खचलेल्या विहीरींचा संबंधित तलाठ्यांकडून पंचनामाही करण्यात आला; परंतु दोन वर्ष उलटले तरी, विहीरीची दुरूस्ती करण्यात आली नाही. एकीकडे शासन स्तरावरून शेतकºयांचे उत्पन्न करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत, दुसरीकडे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सिंचन विहीर दुरूस्तीसाठी शेतकºयांना वारंवार प्रशासनदरबारी येरझारा घालाव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी व्यथीत झाले असून, या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकºयांनी पुन्हा ११ जानेवारीला तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. महिनाभरात विहिरींची दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन