शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाच्या विधवेला न्याय देण्यासाठी पाच दिवसांपासून उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 19:43 IST

राऊत कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अनंता तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला गुरुवारी ५ दिवस झालेत.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकारजिल्हाधिका-यांनी दखल घेण्याची गरज 

लोकमत न्यूजवाशिम:- माजी सैनिकाला शासनाकडून मिळालेल्या शेतजमिनीची परस्पर नोंद करण्यात आली आहे. याबाबत माजी सैनिकाच्या विधवा पत्नीने तक्रार करूनही पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. त्यामुळे  राऊत कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अनंता तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला गुरुवारी ५ दिवस झाले आहेत .माजी सैनिक फकिरा पुंजाजी राऊत यांना १९७१ मध्ये उदरनिर्वाहासाठी मालेगाव तालुक्यातील अनसिंग येथे शासनाकडून जमीन मिळाली आहे. दरम्यान, माजी सैनिक फकिरा राऊत यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांच्या विधवा द्वारकाबाई यांना त्यांच्या जमिनीची प्रल्हाद डिगांबर अढाऊ यांच्या नावाने परस्पर नोंद केल्याचे लक्षात आले. त्यामुळे द्वारकाबाई फकिरा राऊत यांनी याबाबत ३ आॅक्टोबर २००७ ला तत्कालीन जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रारही केली. तथापि, ती जमीन त्यांना मिळाली नाही. त्यानंतर ३० डिसेंबर २०१५  ला सामाजिक कार्यकर्ते अनंता धर्मराज तायडे यांनी याबाबत जिल्हाधिकारी वाशिम निवेदन दिले. वाशिम शहर पोलीस स्टेशनला याबाबत रितसर तक्रारही दिली. मात्र अद्याप राऊत कुटुंबियांना न्याय न मिळाला नाही. त्यामुळे माजी सैनिकाच्या विधवा पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी. अनंता तायडे यांनी ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषण सुरु केले आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सदर प्रकरण महसूल विभागाशी संबंधित असल्याने उपविभागीय महसूल अधिकारी वाशिम यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर प्रकरण मालेगाव तालुक्याशी संबंधित असल्याने उपविभागीय अधिकाºयांकडून कळले.  त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनीच त्यांच्या अधिनस्त अधिकाºयांकडून या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनास आदेशित करावे, असे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे कळविले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनSoldierसैनिक