शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

जलसंधारणासाठी शेतकऱ्यांना मिळणार मोफत जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:47 IST

गरज असलेल्या गावांना मशीन देण्यासाठी बिजेएसने आता पुढाकार घेतला असुन शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी याचा उपयोग करुन घेतल्यास मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे पूर्ण करता येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुजलाम सुफलाम वाशिम प्रकल्पंतर्गत भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) आता जिल्हयातील गावांना जेसीबी मशीन देण्याचे ठरविले आहे. ज्या ज्या गावांना नव्याने जलसंधारणाची कामे करावयाची आहेत, त्यांना ही मशीन मागणीनुसार देण्यात येणार आहे.वाशिम जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याच्या उद्देशाने गतवर्षी जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्यावतीने जलसंधारणाची विविध कामे राबविण्यात आली. आता जिल्ह्यातील ग्रामपंचायती, प्रगतशिल शेतकरी, शेतकरी मंडळे, यांच्यामार्फत प्रस्तावित जलसंधारण कामे करण्यासाठी बिजेएसच्या मशीन मोफत उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातुन सर्व तालुक्यांमध्ये वैयक्तीक व सामुहिक शेततळे, सीसीटी, डीप सीसीटी आदि प्रकारचे जलसंधारणपर उपचार कामे करणे शक्य होणार आहे. याशिवाय गाव तलाव, वनतळे, पाझर तलाव, मोठी धरणे यांमधील गाळ काढणे, नाला खोलीकरण अशी विविध कामे करण्यासाठी देखील ग्रामपंचायती त्यांच्या निधीतून अथवा लोकवर्गणी गोळा करुन मशीन मागवु शकतात. जिल्हा प्रशासन व बिजेएस यांच्या माध्यमाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झालेली असली तरी सुध्दा अजुनही बरीच कामे वाशिम जिल्ह्यात होणे बाकी असल्याचे दिसत आहे. भारतीय जैन संघटनेने संपूर्ण जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला असुन गावांसोबतच आता थेट शेतकऱ्यांना देखील या मशीनचा वापर करुन शेताजवळ असलेले नाले साफसफाई करुन खोलीकरण आणि शेतात नवीन शेततळी तयार करण्यासाठी संधी उपलब्ध केली आहे. गरज असलेल्या गावांना मशीन देण्यासाठी बिजेएसने आता पुढाकार घेतला असुन शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी याचा उपयोग करुन घेतल्यास मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे पूर्ण करता येणार आहेत. या माध्यामतून जिल्हयाची पाणी साठवण क्षमता आणखी वाढण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती आणि शेतकºयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा व सहसमन्वयक निलेश सोमाणी यांनी केले आहे.डिझेल, मानधनाचा खर्च इतरांना करावा लागणारज्या शेतकºयांना व ग्रामपंचायतींना जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशीन हवी असेल त्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत तसेच बिजेएसकडे नावे द्यावीत, ग्रामपंचायतच्या माध्यमातुन भारतीय जैन संघटनेकडून मोफत मशीन पुरवण्यात येईल. याकरिता मशीनला लागणारे इंधन (डिझेल) व मशीन आॅपरेटरचे मानधन याचा खर्च संबंधीत शेतकरी अथवा ग्रामपंचायतींना करावा लागेल. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे बीजेएसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी