शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशिम शेतीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 14:47 IST

वाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी करीत रेशीम शेती करण्याचा संकल्प केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी करीत रेशीम शेती करण्याचा संकल्प केला.महारेशीम नोंदणी अभियानाचा शुभारंभ वाशिम येथे १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्ररथाच्या आधारे रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यात आली. या अभियानाला जिल्ह्यातील शेतकºयांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि ३० डिसेंबरच्या मुदतीपर्यंत जिल्हाभरातील ४८० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांनी सांगितले. शेतीला रेशीम उद्योगाची जोड देण्याच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत चित्ररथासोबत जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावोगावी जावून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना रेशीम शेती करण्याबाबत प्रोत्साहित करतानाच तांत्रिक मार्गदर्शनही केले. त्यामुळेच शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट ५० एकर असताना ४८० शेतकऱ्यांच्या नोंदणीमुळे ४८० एकर क्षेत्रात अर्थात मुळ उद्दिष्टाच्या जवळपास १० पट क्षेत्रात आता रेशीम शेती होणार आहे.  टो येथे रोपनिर्मिती प्रशिक्षणरेशीम शेतीसाठी तुती लागवडीपूर्वी तुती रोपनिर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी करणाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, हे प्रशिक्षण येत्या आठवड्यात वाशिम तालुक्यातील टो येथे घेतले जाणार आहे. रेशीम कार्यालयाच्यावतीने शेतकºयांना रोपनिर्मितीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर शेतकºयांना प्रत्यक्ष स्वत:च्या शेतात रोपनिर्मिती करावी लागणार असून, ही रोपनिर्मिती १५ जानेवारीपासून करावी लागणार आहे. रोपनिर्मितीनंतर १५ जून ते १५ जुलैदरम्यान तुती रोप लागवड करावी लागणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वत: रेशिम विकास अधिकारी अरविंद मोरे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी